
Best Crime Thriller film On Netflix: सिनेविश्वात अशी देखील एक वेळ होती, जेव्हा बॉलिवूड फक्त आणि फक्त रोमाँटिक सिनेमांसाठी ओळखला जायचा, पण आज चित्र बदललं आहे. प्रेक्षकांना आता क्राईम आणि सस्पेंसवर आधारित सिनेमे पाहायला आवडतात आणि खेळवून ठेवण्यासाठी सिनेमातील एक लहान लव्ह स्टोरी… इंडस्ट्रीमध्ये असे देखील अनेक सिनेमे आहेत, जे सत्य घटनेवर आधारित आहेत. काही सिनेमे तर अत्यंत भयानक आहेत… जे पहिल्यानंतर प्रेक्षकांना देखील फार मोठा धक्का बसतो… अशाच एका भयानक कथेबद्दल आज जाणून घेऊ… सिनेमात एक सीरियल किलर आहे, जो लहान मुलांची हत्या करतो..
सध्या सर्व चर्चा रंगली आहे, ‘सेक्टर 36’ सिनेमाची, सत्य घटनेवर आधारित सिनेमाची कथा सीरियल किलरच्या आयुष्याभोवती फिरताना दिसत आहे. हा सीरियल किलर लहान मुलांना त्याच्या निशाण्यावर ठेवायचा… 2024 मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालेला सिनेमा 2 तास 4 मिनिटांचा आहे… एक व्यक्ती कशा प्रकारे प्राण्यापेक्षा देखील भयानक असू शकतो, हे सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
सिनेमात एका अशा सीरियल किलरचं आयुष्य पडद्यावर आणलं आहे, जो आधी लहान मुलांना आपली शिकार बनवतो आणि नंतर त्यांची हत्या करतो. एवढंच नाही, तर हा विकृत माणूस प्रेशर कुकरमध्ये मुलांचे मांस शिजवून खातो. तो हे सर्व त्याच घरात करतो, जिथे तो काम करतो.
सिनेमात असे काही सीन चित्रित करण्यात आले आहेत, जे अत्यंत भयानक आहेत… मुलांची हत्या आणि कुकरचा सीन पाहिल्यानंतर तुम्ही विचलित व्हाल… याशिवाय सिनेमाचा क्लायमॅक्स देखील जबरदस्त आहे… त्यामुळे सिनेमा शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्ही जागेवरून उठणार नाही…
या सिनेमाची कथा जेवढी रंजक आहे, तेवढीच सिनेमातील स्टार कास्ट देखील तगडी आहे. सिनेमात अभिनेता विक्रांत मेसी याने सीरियल किलरच्या भूमिकेला न्याय दिला आहे… विक्रांत याच्यासोबतच अलावदीपक डोबरियाल आणि आकाश खुराना यांनी देखील मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
‘सेक्टर 36’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अनेक दिवस ट्रेंडिंगमध्ये देखील होता. त्याचप्रमामे, आयएमडीबीवर त्याला 7.1 रेटिंगसह उत्कृष्ट दर्जा मिळाला आहे. आता पुन्हा सिनेमा भयान कथेमुळे चर्चेत आला आहे.