36 वर्षे जुना अपशकुनी ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्याने नायक-नायिकेचे करिअर केलं बर्बाद, आजही मिळत नाही काम

36 वर्षे जुना अपशकुनी ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्याने नायक-नायिकेचे करिअर केलं बर्बाद. अभिनेत्रीचा चेहरा झाला खराब तर अभिनेता अजूनही मागतो इंडस्ट्रीमध्ये काम.

| Updated on: Apr 30, 2026 | 12:03 PM
1 / 5
36 वर्षांपूर्वी आलेल्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटाने दोन नवीन कलाकारांना रातोरात स्टार बनवलं पण नंतर त्यांच्या आयुष्याने घेतलेले वेगळे वळण आजही अनेकांना विचार करायला भाग पाडते. हा चित्रपट म्हणजे आशिकी, ज्याने राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

2 / 5
1990 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. या चित्रपटातील गाणी, कथा आणि रोमँटिक केमिस्ट्रीमुळे तो सुपरहिट ठरला. विशेषत राहुल रॉयची रोमँटिक हिरो अशी प्रतिमा तयार झाली. अनु अग्रवाल देखील प्रचंड प्रसिद्धी झाली.

3 / 5
मात्र, सुरुवातीच्या यशानंतर दोघांच्याही करिअरला अपेक्षित दिशा मिळाली नाही. राहुल रॉयने पुढे 35-40 चित्रपटांमध्ये काम केलं तर अनु अग्रवालनेही काही चित्रपट केले पण तिला पुन्हा तसा मोठा हिट चित्रपट मिळाला नाही.

4 / 5
अलीकडे राहुल रॉय एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक डान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल  झाला आहे. ज्यामुळे त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. अनेकांनी त्याच्या परिस्थितीची खिल्ली उडवली आहे.

5 / 5
तर अनु अग्रवालच्या आयुष्यात तर आणखी मोठा धक्का बसला. 1999 मध्ये तिचा गंभीर रस्ते अपघात झाला. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली. ती अनेक दिवस कोमामध्ये होती. तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर कायमचा परिणाम झाला या घटनेनंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. दीर्घ उपचारानंतर ती सावरली पण चित्रपटसृष्टीत पुन्हा सक्रिय होऊ शकली नाही.

Follow Us