AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

43 वर्षापूर्वीचा कमी बजेटचा चित्रपट, फक्त 1.75 लाख रुपये फि घेणारा हिरो बनला मेगास्टार, थिएटर बाहेर तिकिटांसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा

एखादा कलाकार हळूहळू आपली ओळख बनवतोय. पण त्याला मोठ यश मिळणं अजून बाकी आहे. त्यानंतर अचानक एक चित्रपट येतो आणि सर्व काही बदलून जातं. ही खरी कहाणी पूर्ण फिल्मी आहे.

43 वर्षापूर्वीचा कमी बजेटचा चित्रपट, फक्त 1.75 लाख रुपये फि घेणारा हिरो बनला मेगास्टार, थिएटर बाहेर तिकिटांसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा
megastar
| Updated on: Apr 01, 2026 | 8:12 AM
Share

चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा संघर्ष सुरु आहे. चित्रपट सृष्टीत ते हळूहळू स्वत:ची ओळख बनवतायत. पण मोठं यश मिळणं अजून बाकी आहे. नंतर अचानक एखादा चित्रपट मिळतो आणि त्या कलाकारचं आयुष्य बदलून जातं. 1983 साली रिलीज झालेल्या कैदी चित्रपटाने अशीच कमाल केलेली. चिरंजीवीसाठी फक्त हा एक चित्रपट नव्हता, तर त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. खास बाब म्हणजे या चित्रपटासाठी त्याला तेव्हा फक्त 1.75 लाख रुपये मानधन मिळालं होतं. पण त्या बदल्यात त्याला जे मिळालं ते प्रेक्षकांचं प्रेम आणि मेगा स्टारचा टॅग.

या चित्रपटाची सुरुवात ही हॉलीवूड फिल्म ‘फर्स्ट ब्लड’ पासून झाली. ही फिल्म पाहिल्यानंतर कैदी चित्रपटाची कल्पना सुचली. हळू हळू स्टोरी पुढे गेल्यानंतर त्यात देसी इमोशनल टच आला. स्टोरी एका मुलाची आहे, जो परिस्थितीसमोर हार न मानता अजून मजबूत बनून समोर येतो. प्रेम, वेदना आणि बदल्याची ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते.

एक नवीन स्टाइल बनवली

आज जिथे स्टार्सच्या लुकवर लाखो रुपये खर्च होतात, तेच कैदी चित्रपटात चिरंजीवीचा लूक खूप सिंपल होता. काळी पँट आणि बिना बाजूच्या टी-शर्ट वाल्या लूकचा अचानक ट्रेंड सुरु झाला. महत्वाचं म्हणजे हा लूक त्याने स्वत: बनवला होता. घरातून टी-शर्ट घेतला व त्याच्या दोन्ही साईड कापून टाकल्या. एक नवीन स्टाइल बनवली. हीच पुढे चिरंजीवीची ओळख बनली.

किती कोटी कमावले?

‘कैदी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस त्यावेळी जवळपास 8 कोटी रुपयांची कमाई केली. हा 1 कोटीच्या पुढे कलेक्शन करणारा चिरंजीवीचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर गोष्टी बदलल्या. त्यानंतर प्रेक्षक चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा चिरंजीवीच्या नावावर थिएटरमध्ये येऊ लागले. इथूनच त्याचा प्रवास पुढे एक मोठ्या स्टारपदाकडे त्याला घेऊन गेला.

त्यानंतर असे किती चित्रपट आले?

‘कैदी’ फक्त एक चित्रपट नव्हता. त्याने ओळख बनवली. त्यानंतर ‘कैदी नंबर 786′ आणि ‘कैदी नंबर 150′ असे चित्रपट आले. तिन्ही चित्रपटांची कथा वेगवेगळी होती. पण चिरंजीवी ते नाव आहे, ज्याने प्रत्येकवेळी दमदार पुनरागमन केलं.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता