मुमताज यांचं 57 वर्षांपूर्वीचं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, पहिल्यांदा लता मंगेशकरांनी गाण्यासाठी दिलेला नकार

57 वर्षांनंतर देखील बॉलिवूडमधील या गाण्याची जादू चाहत्यांमध्ये कायम आहे. ज्याला लता मंगेशकर यांनी पहिल्या गाण्यासाठी दिलेला नकार. काय होतं कारण?

| Updated on: Jul 23, 2026 | 5:29 PM
1 / 5
भारतरत्न आणि 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. त्यापैकी 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटातील 'बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी' हे गाणे आजही विविध सोहळ्यांमध्ये ऐकायला मिळते.

भारतरत्न आणि 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. त्यापैकी 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटातील 'बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी' हे गाणे आजही विविध सोहळ्यांमध्ये ऐकायला मिळते.

2 / 5

या गाण्याबाबत एक रंजक किस्सा सांगितला जातो. संगीतकार जोडी लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी हे गाणं लता मंगेशकर यांच्यासमोर मांडले तेव्हा त्यांनी सुरुवातीला ते गाण्यास नकार दिला होता.

3 / 5

गाण्याचे स्वरूप आपल्या दर्जाला साजेसे नसल्याचे त्यांना वाटले होते. मात्र, नंतर त्यांनी हे गाणं रेकॉर्ड करण्यास होकार दिला. रेकॉर्डिंगदरम्यान लता मंगेशकर यांनी आपल्या मधुर आवाजाने या गाण्याला वेगळीच उंची दिली.

4 / 5

विशेष म्हणजे, गाण्यातील त्यांची नैसर्गिक हसण्याची आणि खिलखिलण्याची शैली हेच या गीताचे वैशिष्ट्य ठरले. राजेश खन्ना आणि मुमताज यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आजही ते सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते.

5 / 5

या गाण्याच्या अफाट लोकप्रियतेमुळे लता मंगेशकर यांना फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हा सन्मानही मिळाला. सुरुवातीला नाकारलेले हेच गाणे पुढे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या आणि अजरामर गाण्यांपैकी एक ठरले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us