
Dharmendra – Amitabh Bachchan : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली. धर्मेंद्र यांच्या निधनाचा फक्त त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर, सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसला… त्यामधील एक म्हणजे महानायक अमिताभ बच्चन. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. दोघांचा ‘शोले’ सिनेमात कधीच विसरता येणार नाही. सिनेमातील काही डायलॉग आणि जय – वीरूची जोडी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे… पण 24 नोव्हेंबर रोजी वीरुने जयची साथ सोडली… आणि एका चांगल्या मैत्रीचा आणि पर्वाचा अंत झाला…
धर्मेंद्र यांचं निधन झाल्यानंतर अमिताभ बच्चन त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले. मोठ्या दुःखाने बिग बी यांना आपल्या मित्राला शेवटचा निरोप दिला. हा क्षण त्यांच्यासाठी खूपच दु:खद होता. आज धर्मेद्र यांच्या निधनाला 6 दिवस झाले आहेत. अशात अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं आहे.
T 5580 – कुछ क्षण, जीवन के जीना
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 29, 2025
अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्विट फार फक्त 4 शब्दांचं आहे. पण त्यामागे फार मोठा अर्थ दडलेला आहे… ट्विट करत बिग बी म्हणाले, ‘कुछ क्षण, जीवन के जीना….’, सध्या अमिताभ बच्चन यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, बिग बी त्यांच्या ब्लॉगमधून देखील व्यक्त होत असतात. स्वतःच्या मानसिक स्थितीबद्दल म्हणाले, मागील काही आठवणी सतत आठवत आहे, त्यामुळे कोणत्याच कामात मन रमत नाही… पण ‘the show must go on…’ असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले.
सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांना जेव्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला तेव्हा बिग बी त्यांना भेटण्यासाठी देखील गेले होते. मित्राच्या जाण्याने अमिताभ बच्चन पूर्णपणे खचले आहेत. ज्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं…
या कठीण क्षणी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये धर्मेंद्र म्हणतात, “अमिताभ माझ्या धाकट्या भावासारखा आहे. तो अजूनही काम करत असल्याचं पाहून मला खूप आनंद होतो. देव त्याला दीर्घायुष्य देवो.” हे ऐकून बिग बी भावूक होतात. यावेळी मंचावर बिग बींसोबत त्यांची पत्नी जया बच्चन आणि धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनीसुद्धा उपस्थित होत्या.