सलमान खानचा को-स्टार, अरमान कोहलीच्या घरात चोरी, 7 लाखांचा मुद्देमाल लंपास

बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेला, सलमान खानचा को-स्टार, अभिनेता अरमान कोहली याच्या राहत्या घरात चोरी झाली आहे. अरमानच्या लोणावळ्यातील घरी ही चोरी झाली असून रोख पैसे आणि सोन्याची चेन असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

सलमान खानचा को-स्टार, अरमान कोहलीच्या घरात चोरी, 7 लाखांचा मुद्देमाल लंपास
अरमान कोहलीच्या घरात चोरी
Image Credit source: social media
| Updated on: Mar 27, 2025 | 7:42 AM

बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेला, सलमान खानचा को-स्टार, अभिनेता अरमान कोहली याच्या राहत्या घरात चोरी झाली आहे. अरमानच्या लोणावळ्यातील घरी ही चोरी झाली असून रोख पैसे आणि सोन्याची चेन असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. राहत्या घरात झालेल्या या चोरीमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. यासंदर्बात लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

जानी दुश्मन, प्रेम रतन धन पुायो यासांरख्या अनेक मल्टिस्टारर चित्रपटात अरमान कोहली याने काम केलं आहे. बिग बॉस या रिॲलिटी शोच्या हिंदी सीझनमध्येही तो झळकला होता. अरमान कोहलीचे लोणावळ्यात घर आहे. लोणावळ्यातील कोहली इस्टेट मधील त्यांच्या बंगल्यात ही जबर चोरी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.25) सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास लोणावळा हद्दीतील अभिनेत्याच्या कोहली इस्टेट, गोल्ड व्हॅली, तुंगार्ली येथे ही चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. अरमानच्या बंगल्यातील बेडरूममध्ये असलेल्या बेडच्या साईड टेबल लॉकर मध्ये ठेवलेले रोख एक लाख रुपये व 12 तोळ्याची चेन असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

ही चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर 53 वर्षांच्या अभिनेता अरमान राजकुमार कोहली याने लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घरकाम करणाऱ्या दोन नोकरांनी मिळून ही चोरी केली केल्याची आणि त्यानंतर ते पळून गेले असल्या बाबतची तक्रार स्वतः अरमान कोहली याने लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी आकाश (वय 21 वर्षे) व संदीप (वय 23) दोघेही राहणार जौनपुर, उत्तर प्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी लोणावळा पोलिसांतर्फे तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.