Salaar Release Date | जवानच्या वादळाला घाबरला सालार?, शाहरुख खान पुढे प्रभासचे एक पाऊल मागे, चित्रपटाच्या तारखेत मोठा बदल

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाची मोठी हवा ही बघायला मिळत आहे. जवान हा चित्रपट तगडी कमाई करणार असल्याचा अंदाज आहे. शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसत आहे. आता प्रभास याच्या सालार चित्रपटाबद्दल मोठे अपडेट पुढे येत आहे.

Salaar Release Date | जवानच्या वादळाला घाबरला सालार?, शाहरुख खान पुढे प्रभासचे एक पाऊल मागे, चित्रपटाच्या तारखेत मोठा बदल
| Updated on: Sep 02, 2023 | 5:23 PM

मुंबई : साऊथ स्टार प्रभास (Prabhas) याचा आदिपुरुष हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. विशेष म्हणजे आदिपुरुष हा अत्यंत बिग बजेटचा चित्रपट ठरला. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात अपयश मिळाले. आदिपुरुष हा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेला. आदिपुरुष चित्रपट फ्लाॅप गेल्याने प्रभासला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना प्रभास दिसला. मुळात म्हणजे आदिपुरुषचे टिझर आणि पोस्टर रिलीज झाल्यापासून तो लोकांच्या निशाण्यावर राहिला. चित्रपट निर्मात्यांनी अनेक बदल केले.

लोक आदिपुरुष चित्रपटावर सतत टिका करताना दिसले आणि परिणामी चित्रपट फ्लाॅप गेला. प्रभासचा चित्रपट फ्लाॅप गेल्याने त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. मात्र, आदिपुरुष चित्रपट फ्लाॅप गेल्याने त्याचे चाहते निराश न होता. प्रभासच्या आगामी सालार चित्रपटाकडून आता चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

बाॅलिवूड स्टार शाहरूख खान याचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होतोय. तर दुसरीकडे प्रभास याचा सालार हा चित्रपट 28 सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र, आता नुकताच सालार चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत चित्रपटाच्या तारखेमध्ये थेट मोठा बदल करून टाकला आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले.

काही लोकांचे म्हणणे आहे की, सालार चित्रपटाचे निर्माता हे शाहरूख खान याच्या जवान चित्रपटाला घाबरले. यामुळेच सालार चित्रपटाची रिलीज डेट बदलून टाकली. प्रभास हा आपल्या सालार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. प्रभास याला देखील सालार या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

सालार हा चित्रपट आता नोव्हेंबरमध्ये रिलीज केला जाईल. मात्र, यादरम्यानच सलमान खान याचा टायगर हा चित्रपट रिलीज होणार आहे. यामुळे आता सालार हा चित्रपट नेमका काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सालार चित्रपटाची नवीन तारीख जाहिर झाल्यानंतर एका युजर्सने लिहिले की, भाई दिवाळीमध्ये नको. दुसऱ्याने लिहिले की, टायगरसमोर टिकणे कठीण आहे.