Adipurush | आदिपुरुषच्या निर्मात्यांना ‘ही’ मोठी चुक भोवणार? वाद वाढण्याची चिन्हे, थेट कार्टून

| Updated on: Jun 10, 2023 | 8:05 PM

आदिपुरुष चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचा वाद काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आता गाण्यामुळे आदिपुरुष हा चित्रपट मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडलाय. आदिपुरुष चित्रपटावर सतत टीका केली जात आहे. नेटकऱ्यांच्या निशाण्यावर चित्रपटाचे निर्माते देखील आहेत.

Adipurush | आदिपुरुषच्या निर्मात्यांना ही मोठी चुक भोवणार? वाद वाढण्याची चिन्हे, थेट कार्टून
आदिपुरुष
Follow us on

मुंबई : ओम राऊत यांचा आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेपेक्षा अधिक वादात सापडलाय. आदिपुरुष चित्रपट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. विशेष म्हणजे आदिपुरुष हा ओम राऊत यांचा अत्यंत बिग बजेटचा चित्रपट आहे. या चित्रपटाचे तब्बल 500 कोटींचे बजेट आहे. मात्र, या चित्रपटाचा वाद काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आदिपुरुष चित्रपटात प्रभास, कृति सेनन आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे मुख्य भूमिकेत आहेत. आदिपुरुष 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे सैफ अली खान हा सोडून चित्रपटाची (Movie) टीम जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

ओम राऊत यांचा आदिपुरुष हा चित्रपट रामायणवर आधारित आहे. या चित्रपटात प्रभास हा भगवान रामच्या भूमिकेत. कृति सेनन माता सीतेच्या भूमिकेत आणि सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आहे. सैफ अली खान याच्या लूकवरून काही दिवसांपूर्वी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. वादापासून दूर राहण्यासाठी सैफ अली खान हा चित्रपटाचे प्रमोशन देखील करताना दिसत नाहीये.

आदिपुरुष चित्रपटातील गाणे राम सिया राम या गाण्यावरून आता मोठा वाद रंगताना दिसत आहे. या गाण्यात चुकीचे दाखवल्याचे अनेकांनी म्हटले आहे. रामचरितमानसमध्ये लिहिले आहे की, जेंव्हा अशोक वाटिकेत हनुमान जी माता सीतेला राम मुद्रिका देतात तेव्हा माता सीताही तिच्या ओळखीसाठी त्यावेळी तिच्या दागिन्यांचा एक तुकडा देते.

पुढे माता सीता हे चूडामणी भगवान श्रीरामांना देण्यास सांगते. मात्र, आदिपुरुष चित्रपटामध्ये माता सीता हनुमाना जीला बांगडी देते असे दाखवण्यात आले आहे, जे चुकीचे असल्याचा दावा केला जातोय. यामुळेच सोशल मीडिया यूजर्स भडकल्याचे दिसत आहे. यामुळे आता परत एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आदिपुरुष चित्रपट आणि टीम आली आहे.

आदिपुरुष चित्रपटाला लोक तूफान ट्रोल करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अनेकांनी थेट आदिपुरुष चित्रपटाला कार्टून चित्रपट असल्याचे देखील थेट म्हटले आहे. प्रभास आणि कृति सेनन यांच्या अफेअरच्या चर्चा या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहेत. आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवरच कृति सेनन आणि प्रभास यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाल्याचे देखील सांगितले जात आहे. करण जोहर याच्या शोमध्ये यावर भाष्य करताना देखील काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दिसली होती.