शेफाली जरीवालाच्या मृत्यूपूर्वी घरात झाली होती खास पूजा; हिंदुस्थानी भाऊंनी सांगितलं ते सत्य

शेफाली जरीवालाचे निधन झाले या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.तिच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीतही शोककळा पसरली आहे. शेफालीच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्यूच्या कारणाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान याचदरम्यान हिंदुस्थानी भाऊने माहिती देत सांगितलं की, तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी तिच्या घरी एक पूजाही झाली होती.  

शेफाली जरीवालाच्या मृत्यूपूर्वी घरात झाली होती खास पूजा; हिंदुस्थानी भाऊंनी सांगितलं ते सत्य
Shefali Jariwala home Puja
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 28, 2025 | 5:48 PM

आजची सकाळ बॉलिवूडसाठी दुःखद बातमी घेऊन आली. शेफाली जरीवालाचे निधन झाले या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. शेफाली 90 च्या दशकातील मुलांसाठी नेहमीच काँटा लगा गर्ल राहील आहे. शेफालीच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीतही शोककळा पसरली आहे. शेफालीच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्यूच्या कारणाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिच्या मृत्यूच्या अचानक आलेल्या बातमीने केवळ चाहतेच नाही तर संपूर्ण मनोरंजन उद्योगाला धक्का बसला आहे.

कार्डियाक अरेस्टमुळे शेफालीचा मृत्यू

सुरुवातीच्या अहवालात शेफालीच्या मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्टमुळे असल्याचे म्हटले आहे. तथापि, आता असे समोर आले आहे की पोलिस आणि फॉरेन्सिक टीम रात्री उशिरा 1 वाजता शेफालीच्या घरी पोहोचली. घरात उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, लोक तिच्या घरी पोहोचत आहेत. हिंदुस्थानी भाऊ देखील तिथे पोहोचले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शेफाली हिंदुस्थानी भाऊला राखी बांधायची

शेफाली हिंदुस्थानी भाऊंना राखी बांधायची. ती त्यांना आपला भाऊ मानत असे आणि अशा परिस्थितीत हिंदुस्थानी भाऊही खूप दुःखी दिसत होते. माध्यमांशी बोलताना हिंदुस्थानी भाऊ म्हणाले की, काल शेफालीच्या घरी भगवान सत्यनारायणाची पूजा होती. अन् रात्रीच मला कळले की तिचे निधन झाले आहे. तिच्या या निधनाच्या बातमीने मृत्यूने भाऊंना खूप धक्का बसला आहे.


आता तिचा कॉल कधीच येणार नाही

भाऊ पुढे म्हणाले की, “मला नेहमीच तिचे फोन यायचे पण आतापासून नंबर मोबाईलमध्येच राहील पण कॉल कधीच येणार नाही”. शेफालीबद्दल बोलताना भाऊ म्हणाले की ‘शेफाली संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्यायची. ती स्वतःहून काम करायची. मला कधीच वाटले नाही की ती आजारातून बरी झाली आहे.” शेफालीची आठवण येताच भाऊचे डोळे अश्रूंनी भरले. खरं तर शेफालीच्या निधनामुळे इंडस्ट्रीतील अनेकांचे डोळे पाणावले होते.

फिटनेस हेच तिचे प्राधान्य होते.

दरम्यान तिचा अत्यंत जिवलग मित्र आणि फिटनेस ट्रेनरनेही सांगितले की, शेफाली आरोग्याबाबत अत्यंत शिस्तबद्ध होती. ती नियमित व्यायाम करायची. ती योग्य आहाराचे पालन करीत होती आणि फिटनेस हेच तिचे प्राधान्य होते. तिच्या एपिलेप्सी त्रासावर नियंत्रण ठेवण्यासाठी ती थंड अन्नपदार्थ आणि पेये टाळत असे व पॅनिक अटॅक येऊ नये म्हणून ठराविक दिनक्रम ती पाळायची असंही त्याने सांगितले.