हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा, चाहत्यांमध्ये खळबळ, ‘ती’ पोस्ट…

Hardik Pandya Divorce : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याच्यावर आयपीएलदरम्यान जोरदार टीका करण्यात आली. हार्दिक पांड्या आता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक पांड्या हा पत्नी नताशा हिच्यासोबत लवकरच घटस्फोट घेत असल्याचे सांगितले जातंय.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा, चाहत्यांमध्ये खळबळ, ती पोस्ट...
hardik pandya
| Updated on: May 28, 2024 | 8:51 AM

हार्दिक पांड्या याच्यासाठी यंदाच्या आयपीएलचे सीजन अजिबात खास ठरले नाही. सुरूवातीपासूनच हार्दिक पांड्या हा लोकांच्या निशाणावर राहिला. रोहित शर्माला काढून हार्दिक पांड्याला मुंबई संघाचे कर्णधार केल्याने चाहत्यांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला. हेच नाही तर हार्दिक पांड्या हा मैदानात खेळण्यासाठी उतरला तरीही लोक त्याला टार्गेट करताना दिसले. ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. आता आयपीएलचे फायनल होऊन अवघे काही दिवस झाले नाहीत, तोच हार्दिक पांड्या याच्याबद्दल विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत.

हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले असून पत्नी नताशा हिच्यासोबत लवकरच हार्दिक पांड्या हा घटस्फोट घेऊ शकतो, असे सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर दोघे विभक्त झाल्याचेही सांगितले जातंय. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा वाद टोकाला गेल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. मात्र, यावर हार्दिक पांड्या किंवा नताशा यांच्यापैकी कोणीच भाष्य केले नाहीये.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट तूफान व्हायरलर होताना दिसतंय. ही पोस्ट पाहून लोक हैराण झालेत. Reddit वर एक पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. या पोस्टमध्ये थेट मोठा खुलासा हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्याबद्दल करण्यात आलाय. ज्यानंतर लोक हैराण होताना दिसत आहेत.

या पोस्टनुसार हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट हा फक्त आणि फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. आयपीएलमध्ये खराब झालेली इमेज आणि लोकांचा संताप कमी करण्यासाठी हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्याकडून घटस्फोटाचा स्टंट केला जातोय, असे सांगितले जात आहे. अजूनही हार्दिक पांड्या आणि नताशा याच्याकडून घटस्फोटाबद्दल बोलण्यात नाही आले.

नताशा हिने एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, एक व्यक्ती लवकरच रस्त्यावर येणार आहे. यानंतर ती हार्दिक पांड्या याच्याबद्दलच बोलत असल्याचा तर्क लावण्यात आला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 2020 मध्ये लग्न केले. हेच नाही तर हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा एक मुलगा देखील आहे. हार्दिक पांड्या हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, 50 टक्केच संपत्ती ही त्याच्या नावावर आहे.