AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकअपनंतरही एक्सला भेटते नताशा? ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट..

Hardik Pandya and Natasa Stankovic Divorce : हार्दिक पांड्या हा सध्या तूफान चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. हार्दिक पांड्या आणि नताशा याचा घटस्फोट होणार असल्याची तूफान चर्चा आहे. काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

ब्रेकअपनंतरही एक्सला भेटते नताशा? 'तो' व्हिडीओ व्हायरल, हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट..
Hardik Pandya and natasha
| Updated on: May 26, 2024 | 12:38 PM
Share

हार्दिक पांड्या हा सध्या त्याच्या क्रिकेटपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलाय. हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात वादळ आल्याचे सांगितले जातंय. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा हे विभक्त झाल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर हार्दिक पांड्याचे घर नताशा हिने सोडले आहे. नताशा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. नताशा हिच्या या पोस्टनंतर लोक हैराण झाले. नताशा हिने थेट म्हटले होते की, लवकरच एकजण रस्त्यावर येणार आहे. नताशा हिने हे हार्दिक पांड्या याच्याबद्दलच बोलल्याचे सांगितले जाते. घटस्फोटाची चर्चा असतानाच नताशा ही मुंबईतील बांद्रा परिसरात स्पॉट झाली.

हार्दिक पांड्याला डेट करण्याच्या अगोदर नताशा ही अली गोनी याला डेट करत होती. हेच नाही तर हे एका शोमध्येही सहभागी झाले होते. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आता नताशा आणि अली गोनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये नताशा हिच्याकडून मोठा खुलासा केला जातोय.

या व्हिडीओमध्ये फक्त नताशा हीच नाही तर अली गोनी हा देखील दिसतोय. या व्हिडीओमध्ये अली गोनी याच्यासोबत ब्रेकअप होऊनही त्याला भेटत असल्याचे सांगताना नताशा दिसत आहे. हा व्हिडीओ तसा नताशाचा जुना आहे. म्हणजे ब्रेकअपनंतरही एक्सला नताशा भेटते. आता हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. हेच नाही तर अनेकांनी थेट म्हटले की, लग्नानंतरही ही एक्सला भेटत असेल.

ब्रेकअपनंतरही एक्सला भेटण्याच्या सवयीमुळेच हार्दिक पांड्या हिच्यासोबत घटस्फोट घेत असेल असेही काही लोकांनी म्हटले आहे. घटस्फोटाच्या चर्चांवर अजूनही हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी भाष्य केले नाहीये. मात्र, रिपोर्टनुसार दोघांमधील वाद हा टोकाला गेलाय. हार्दिक पांड्या आणि नताशा यांना एक मुलगा देखील आहे. नताशा हिने सोशल मीडियावरून पांड्या हे नाव काढून टाकले आहे.

हार्दिक पांड्या याचा देखील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या हा स्पष्ट सांगताना दिसतोय की, माझी संपत्ती फक्त 50 टक्केच माझ्या नावावर आहे. बाकी माझी सर्व संपत्ती ही माझ्या आईच्या नावावर आहे. हेच नाही तर गाड्या घर सर्व माझ्या वडिलांच्या आणि भावाच्या नावावर आहे. म्हणजे हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेऊन फार काही पैसा नताशा हिला मिळणार नाहीये.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा