प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात गुपचूप कतरिना कैफ हिचा फोटो काढताना दिसला रणबीर कपूर, नेटकऱ्यांनी थेट…

Ranbir Kapoor and Katrina Kaif : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या सोहळ्यासाठी बाॅलिवूड कलाकार हे मोठ्या प्रमाणात पोहचले. आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ रणबीर कपूर याचा आहे.

प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात गुपचूप कतरिना कैफ हिचा फोटो काढताना दिसला रणबीर कपूर, नेटकऱ्यांनी थेट...
| Updated on: Jan 23, 2024 | 7:22 PM

मुंबई : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा हा नुकताच पार पडलाय. या सोहळ्यासाठी बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांना निमंत्रण होते. काही कलाकार हे तर कालच अयोध्येत दाखल झाले. आता या सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. रणबीर कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफ, विकी काैशल, कंगना राणावत, अनुपम खेर, अमिताभ बच्चन, रोहित शेट्टी हे या सोहळ्यासाठी उपस्थित होते. यासोबतच साऊथच्या स्टार्सने देखील या सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

अयोध्येतील याच सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ आता चर्चेचा विषय ठरलाय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर लोक हे रणबीर कपूर याची खिल्ली उडवताना दिसत आहेत. हेच नाही तर या व्हिडीओनंतर रणबीर कपूर याच्यावर टीका देखील मोठ्या प्रमाणात केली जातंय.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रणबीर कपूर याच्या शेजारी आलिया भट्ट ही बसली आहे आणि आलियाच्या शेजारी मुकेश अंबानी यांची मोठी सून. आलिया आणि श्लोका या गप्पा मारत आहेत. आलिया आणि रणबीर कपूर यांच्या मागच्या लाईनमध्ये विकी काैशल आणि कतरिना हे दोघे बसले आहेत.

यावेळी अचानकपणे रणबीर कपूर हा आपला मोबाईल काढतो आणि थेट सेल्फी घेतो. मात्र, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, रणबीर कपूर हा गुपचूपपणे कतरिना कैफ हिचा फोटो काढतो. ही बाब कतरिना कैफ हिच्या देखील लक्षात येते. मात्र, रणबीर कपूर याला काहीच प्रतिसाद देताना कतरिना कैफ ही अजिबातच दिसत नाही.

यानंतर थेट आलिया देखील रणबीर कपूर याच्या सेल्फीकडे बघताना दिसत आहे. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक रणबीर कपूर याची खिल्ली उडवत आहेत. एकाने लिहिले की, अरे आता तिचे लग्न झाले आहे. दुसऱ्याने लिहिले की, अशी कामे आम्ही काॅलेजमध्ये असताना करत होतो. तिसऱ्याने लिहिले की, अरे हा काय प्रकार आहे.