Video: पायात स्लिपर, अंगावर साधा शर्ट; सुनील पालची अवस्था पाहून नेटकरी थक्क

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कॉमेडीयन सुनील पालची अवस्था पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Video: पायात स्लिपर, अंगावर साधा शर्ट; सुनील पालची अवस्था पाहून नेटकरी थक्क
Sunil Pal
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 13, 2025 | 5:19 PM

एकेकाळी भारतातील प्रसिद्ध कॉमेडीयन म्हणून सुनील पाल ओळखला जात होता. गेल्या काही दिवसांपासून तो खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर सुनील पालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो किस किसको प्यार करूं 2 या चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सुनील पालचा अवतार पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. आता सुनील पालसोबत नेमकं काय झालं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

काय आहे व्हिडीओ?

एक सेलिब्रिटी फोटोग्राफर पेजने सुनील पालचा व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुनील पालने आकाशी रंगाचा साधा शर्ट घातला आहे. त्यावर त्याने साधी निळ्या रंगाची जिन्स घातली आहे. तसेच डोक्यावर टोपी आणि पायात स्लिपर असा लूक करुन सुनील पाल प्रीमियरला पोहोचले होते. सुनील पालच्या चेहरा देखील एखाद्या आजारी असलेल्या रुग्णासारखा वाटत होता. त्यामुळे हा लूक पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

सोशल मीडियावर सुनील पालचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. काहींनी कमेंट करत सुनील पाल यांची परिस्थिती फार वाईट असल्याचे सांगितले आहे. तर काहींनी सुनील पाल हे अडचणींचा सामना करतायेत असे सांगितले आहे. एका यूजरने तर मदत तर सहकारी करतील, पण हा त्यांनाही टीका करून उलटसुलट काहीतरी बोलेल. अशा लोकांची कुणीही मदत करत नाही. याने कुणाशीही चांगले संबंध ठेवले नाहीत, सगळ्यांना शिवीगाळ करतो, स्वतःलाच देव समजू लागला आहे. अशा लोकांची अवस्था शेवटी अशीच होते अशी कमेंट केली आहे.

कोण आहे सुनील पाल?

सुनील पाल हा भारतातील अतिशय प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेता आणि व्हॉईस आर्टिस्ट आहे. त्याने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोच्या पहिल्या सिझनचे विजेते पद पटकावले होते. त्यानंतर त्याची स्टँडअप कॉमेडी, मिमिक्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. त्याने ‘हम तुम’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ अशा काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. डिसेंबर 2024 मध्ये त्याचे अपहरण झाल्याचे प्रकरण समोर आले होते.