Aditya Thackeray यांच्यासोबत लंच डेटवर प्रसिद्ध अभिनेत्री स्पॉट, दोघांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

Aditya Thackeray : दिशा पटानी हिच्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासोबत 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लंच डेटवर..., दोघांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल.. व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत दिल्या आहेत प्रतिक्रिया...

Aditya Thackeray यांच्यासोबत लंच डेटवर प्रसिद्ध अभिनेत्री स्पॉट, दोघांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Nov 07, 2025 | 10:28 AM

Aditya Thackeray : सोशल मीडियावर सध्या माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका रेस्टोरेंटमधील आदित्य ठाकरे यांच्यासोबत अभिनेत्री भुमी पेडणेकर देखील दिसत आहे. आदित्य ठाकरे आणि भुमी पेडणेकर यांना एकाच रेस्टोरेंटमध्ये एकत्र पाहिल्यानंतर चर्चांना उधाण आलं आलं आहे. यावेळा आदित्य ठाकरे आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत अन्य व्यक्ती देखील असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा देखील गोंधळ उडाला आहे. ती भेट लंच डेट होती की बिझनेस डील मीटिंग? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत.

सांगायचं झालं तर, अनेक सोशल मीडिया पोस्टनुसार, भूमीने YGL (यंग ग्लोबल लीडर्स) सदस्य आदित्य ठाकरे आणि क्रिस्टर जोस यांच्यासाठी जेवणाचं आयोजन केलं होतं. भूमी ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या यंग ग्लोबल लीडर्स (YGL) कम्युनिटीची सदस्य देखील आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबरमध्ये, जिनिव्हा येथे झालेल्या यंग ग्लोबल लीडर्स समिट 2025 मध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. भुमी पेडणेकर हिच्या सर्व चाहत्यांसाठी हा अभिमानाचा क्षण होता.

 

 

भुमी पेडणेकर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, भुमी प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. सामाजिक समस्या आणि पर्यावरण संरक्षणासाठी भुमी अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत काम करते. अभिनेत्री वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्स (YGL) ची सदस्य देखील आहे.

अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत भुमी हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता आदित्य ठाकरे यांच्यासोबत भुमी हिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तर आदित्य ठाकरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळ ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आणि शिवसेना (UBT) चे युवा नेते आहेत. राजकारणाव्यतिरिक्त, ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखले जातात.

6 नोव्हेंबर रोजी वांद्के येथील एका रेस्टोरेंटमध्ये भुमी पेडणेकर आणि आदित्य ठाकरे इतर अन्य दिग्गजांसोबत दिसले. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तर अनेक नेटकरी त्यांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहे.

सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसोबत आदित्य ठाकरे आणि कुटुंबियांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. आदित्या ठाकरे यांचा अभिनेत्री दिशा पटानी हिच्यासोबत देखील व्हिडीओ व्हायरल झालेला. तेव्हा देखील अनेक चर्चा रंगल्या…