AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्या 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात नवं ट्विस्ट, माजी कर्मचाऱ्यांनी समन्स आणि…

Shilpa Shetty - Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. कोर्टाने कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांना समन्स बजावलं असून अनेक बाजूंनी सखोल चौकशी सुरु आहे.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्या 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात नवं ट्विस्ट, माजी कर्मचाऱ्यांनी समन्स आणि...
फाईल फोटो
| Updated on: Nov 07, 2025 | 9:23 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पति राज कुंद्रा यांच्या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याला 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलं आहे. या फसवणूक प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने उद्योजक राज कुंद्रा याच्या बेस्ट डील प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी कर्मचाऱ्याला 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे.

बेस्ट डील प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी पुढील आठवड्यात फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली जाईल सर्व माजी कर्मचारी आणि भागधारकांचे जबाब नोंदवल्यानंतर, आवश्यक असल्यास EOW कुंद्रा यांना पुढील चौकशीसाठी पुन्हा बोलावू शकते.

कंपनीचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि माजी संचालकांसह अनेक माजी कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात त्यांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांत चौकशीसाठी हजर राहावं लागेल… असं देखील सांगण्यात येत आहे.

न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले

आर्थिक गुन्हे शाखेने कर्मचाऱ्यांची कंपनीबद्दल चौकशी केली आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेतन कलं दिलं जातं हे माहिती करुन घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय कंपनीच्या होत असलेल्या नफ्यातून कर्मचाऱ्यांचं वेतर होतं का? किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भाग दुसऱ्या कोणत्या माध्यमातून येक आहे… कार्यालयांच्या फर्निचरसाठी 20 कोटी रुपये खर्च झाले का? अशा अनेक बाजूंनी तपास सुरु आहे.

कंपन्यांना फर्निचर पुरवल्या जाणाऱ्या कंपन्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी शिल्पा शेट्टीने परदेशात जाण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावत म्हटले की, आधी फसवणुकीची रक्कम भरा आणि नंतर जिथे जायचे तिथे जा.

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा शिल्पा आणि राज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. याआधी देखील अनेकदा शिल्पा आणि राज यांना कोर्टाची पायरी चढवी लागली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात असलेल्या राज याला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावं लागलं. पण याप्रकरणी त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर अनेकदा संपत्तीमुळे देखील राज आणि शिल्पा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले… सध्या सर्वत्र शिल्पा – राज यांच्या वादग्रस्त प्रकरणांची चर्चा सुरु आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.