आमिर खान आहे कपिल शर्माचा मोठा फॅन, पण शोमध्ये येण्यास मात्र नकार, सांगितले कारण…

The Kapil Sharma Show : बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान आणि कपिल शर्मा दोघेही त्यांचा मित्र गिप्पी गरेवालला आगामी चित्रपटासाठी सपोर्ट करण्यासाठी आले होते.

आमिर खान आहे कपिल शर्माचा मोठा फॅन, पण शोमध्ये येण्यास मात्र नकार, सांगितले कारण...
Image Credit source: instagram
| Updated on: May 31, 2023 | 10:23 AM

Aamir Khan About TKSS : ‘द कपिल शर्मा शो’ या (the kapil sharma show) कार्यक्रमात आतापर्यंत बॉलीवूडपासून ते क्रीडा जगतातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. दर आठवड्याला नवनवे सेलिब्रिटी त्यांच्या आगामी चित्रपटाचे किंवा कामाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमात येत असतात. शाहरूख खान, सलमान खान याच्यापासून ते सुधा मुर्ती यांच्यापर्यंत अनेक जण या शोमध्ये सहभागी झाले आहेत. पण मास्टर ब्लास्टर सचि तेंडुलकर तसेच बॉलिवूडचा सुपरस्टार, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (aamir khan) मात्र आजपर्यंत या शोमध्ये आलेले नाहीत. कपिल नेहमीच या दोघांना त्याच्या शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित करतो. पण अजूनतरी हे दोघेही या शोमध्ये दिसलेले नाहीत.

कपिलच्या शोमध्ये का गेला नाही, याबद्दल आमिर खाननेच खुलासा केला आहे. खरंतर आमिर खान आणि कपिल शर्मा दोघेही गिप्पी गरेवालच्या ‘कॅरी ऑन जट्टा 3’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमिर खान म्हणाला की, ‘खरंतर मला कपिलला सांगायचे आहे की दोन आठवड्यांपूर्वी मी कपिलला फोन केला होता. मी सध्या कमी काम करत आहे. मी आजकाल माझ्या कुटुंबासोबत खूप वेळ घालवत आहे आणि मला कॉमेडी पाहायला आवडते. रोज रात्री झोपायच्या आधी मी काहीतरी बघतो.

आमिर आहे कपिल शर्मा शो चा फॅन

आमिर पुढे म्हणाला की, गेल्या अनेक महिन्यांपासून मी कपिलचा शो पाहतो, मी कपिलच्या शोचा खूप मोठा चाहता आहे आणि जेव्हा तो इथे आला तेव्हा मलाच सर्वात जास्त हसू आले होते. कपिलने माझी संध्याकाळ रंगीन केली आगे. मी खूप हसलो, त्याने खूप मनोरंजन केले, असेही आमिरने नमूद केले.

 

आमिरने केला कपिलला सवाल

त्यानंतर आमिरने कपिलला विचारले की, “आपने मुझे कभी अपने शो पर नहीं बुलाया कपिल ?” असा प्रश्न विचारत आमिरने सांगितले की, मीडियाने विचारण्यापूर्वीच मी कपिलला हा प्रश्न विचारला. त्यावर कपिल म्हणाला की, “तुम्ही आमच्या शोमध्ये आलात तर ते आमचं सौभाग्य असेल. मी आमिर भाईला अनेकवेळा विनंतीदेखील केली आहे. तो म्हणतो ठीक आहे, मी बाहेर जात आहे. त्यानंतर जेव्हा आमची भेट होते, आम्ही बोलतो, तोपर्यंत तीन वर्ष उलटलेली असतात.’असे कपिलने गमतीत नमूद केले.

आमिरने केला मोठा खुलासा

कपिलच्या शोमध्ये अद्याप सहभागी न होण्याचे कारण खुद्द आमिरनेच सांगितले. ‘ माझा एखादा चित्रपट रिलीज होणार असतो, तेव्हा तू (कपिल) फोन करतोस. मला शोमध्ये येण्याचे निमंत्रण देतोस. पण खरं सांगायचं तर, मला (शोमध्ये) चित्रपटासाठी (प्रमोशनसाठी) यायचं नाहीये. मला मजा करण्यासाठी, एंटरटेनमेंटसाठी यायचं आहे. ‘ आता आमिक खरंच कधी कपिलच्या शोमध्ये येतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.