‘दंगल’ गर्ल झायरा वसीमवर दुःखाचा डोंगर; म्हणाली, ‘दुआओं मे याद करे…’

Zaira Wasim | झायरा वसीम हिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली, 'दुआओं मे याद करे...', अभिनेत्रीवर कोसळला आहे दुःखाचा डोंगर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झायरा हिने शेअर केलेल्या 'त्या' पोस्टची चर्चा...

दंगल गर्ल झायरा वसीमवर दुःखाचा डोंगर; म्हणाली, दुआओं मे याद करे...
| Updated on: May 29, 2024 | 7:59 AM

‘दंगल’ या पहिल्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या माजी अभिनेत्री जायरा वसीमने (Zaira Wasim) आपल्या कारकिर्दीत फक्त तीन सिनेमांमध्येमध्ये काम केले. आता झायरा अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. झायरा हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन झालं आहे. झायरा हिच्या वडिलांचं नाव झाहिद वसीम असं होतं. झायरा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे.

झायरा दुःख व्यक्त करत म्हणाली, ‘माझे वडील झाहिद वसीम यांचं निधन झालं. कृपया त्यांना आपल्या प्रार्थनेत लक्षात ठेवा. अल्लाहकडे प्रार्थना करा की त्यांच्या उणीवा माफ करा, त्याची कबर शांत करा, वेदनांपासून वाचवा, इथून पुढे त्यांचा प्रवास सोपा करा. त्यांना जन्नत आणि माघिरामध्ये सर्वोच्च स्थान द्या.’ सध्या झायरा हिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

 

 

झायरा हिचे चाहते देखील तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत. झायरा आता बॉलिवूडपासून दूर असली तरी चाहते तिला विसरु शकले नाहीत. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

झायरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘दंगल’ सुपरहिट झाल्यानंतर झायरा वसीम ‘सिक्रेट सुपरस्टार’ या सीनेमात आमिर खानसोबत दिसली. ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमानंतर देखील झायरा हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धी मोठी वाढ झाली होती.

एवढंच नाही तर, झायरा प्रियांका हिने चोप्रासोबत ‘द स्काय इज पिंक’ सिनेमात देखील काम केलं. पण सिनेमाची शुटिंग पूर्ण झाल्यानंतर झायरा हिने अभिनय सोडल्याची घोषणा केली. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. करियर यशाच्या शिखर चढत असताना झायरा हिने घेतलेला निर्णय चाहत्यांना धक्का देणारा होता.

धर्माचं कारण देखल तिने सिनेविश्वाचा निरोप घेतला. झायरा वसीम पोस्ट करत म्हणाली होती, ‘तिच्या कामावर खूश नाही, कारण ते तिला तिच्या धर्मापासून दूर नेत आहे. अभिनेत्री बनल्यामुळे ती इस्लामपासून दूर होत आहे. यामुळे आता ती फिल्म इंडस्ट्री सोडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री सिनेविश्वापासून दूर आहे.