
मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे असा अभिनेता म्हणजेच अर्थातच आमिर खान. आमिर खान हा नेहमीच त्याच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतो. कोणत्याही गोष्टीवर त्याचे मत तो स्पष्टपणे मांडतो. आमिरचा आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ चर्चेत आहे.
आमिर खानने एकापेक्षा एक सुपरहीट चित्रपटही दिले आहेत. त्याची ओळख ही मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून असली तरी तो शुटींगवेळी सेटवर धम्माल- मस्ती करत असतो असं त्याच्या अनेक सहकलाकारांनीही सांगितलं आहे. असाच एक किस्सा सांगितलेला त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये फराह खान आमिर सेटवर कशी मस्ती करतो याविषयी सांगताना दिसत आहे. ती म्हणते की “हा अभिनेत्रींना हात दाखवण्यास सांगतो आणि मग त्यानंतर त्यांच्या हातावर थुंकतो”.
आमिर खान अभिनेत्रींच्या हातावर का थुंकतो?
त्यावेळी त्याच्या समोर त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटातील सहकलाकार सना शेख आणि सान्या मल्होत्रा देखील उपस्थित होत्या. तर त्यांनी देखील हे मान्य केलं. तसेच यावर राजीवर मसंद म्हणाले की, “आमिर नेहमीच असं करतो आणि अजूनही तो करतोय. तो नेहमी बोलतो की तुमचा हात दाखवा आणि मग त्यावर थुंकतो.
यावेळी जेव्हा आमिर खानला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की ” मी माझ्या अभिनेत्रींच्या हातावर का थुंकतो? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण मी ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकलोय त्या सगळ्या स्टार झाल्या आहेत” असं म्हणत त्याने अभिनेत्रींच्या हातावर का थुंकतो याबाबत खुलासा केला आहे. तसेच त्याने आमिरनं फातिमा आणि सान्याच्या हातावर थुंकल्याचं मान्य केलं. त्याचा हा जुना व्हिडीओ आहे जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आमिर खाननं आजवर बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. त्यात जूही चावला, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, काजोलसारख्या लोकप्रिय अभिनेत्रींसोबत तो दिसला. त्यांच्यासोबत त्यानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आता आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
व्हायरल व्हिडीओवरून आमिर खान ट्रोल
दरम्यान आमिरच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी आमिरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “सेलिब्रिटींनी काही केलं तरी सगळ्यांना ती फक्त मस्करी वाटते”. तर, दुसरा नेटकरी म्हणाला, “हे काय लॉजिक आहे? मस्करी म्हणून देखील हे ठीक नाही. हे तर राग येण्यासारखं आहे”. तिसरा युजर्सने म्हटलं आहे “त्यानं कधी विचार केलाय का की त्या अभिनेत्रीला किती राग येत असेल?”
नेटकऱ्यांनी त्याच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांची ही मस्करी आणि त्याने सांगितलेले लॉजिक हे दोन्हीही चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.