अजितदादांना सर्वात मोठा धक्का, ऐन निवडणुकीत लोकप्रिय नेता थेट शिंदे गटात; भुजबळांनाही…
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. येथे छगन भुजबळ यांना जबर धक्का बसला आहे. त्यांचा विश्वासू माणूस शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाला आहे.

Nashik Municipal Election : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या संपूर्ण राज्यात एकाच वेळी 29 महापालिकांच्या निवडणुका होत असून त्यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सोबतच या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागेल. दरम्यान, या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस रंगणार आहे. कारण या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सुहास कांदे तसेच अजित पवा यांच्या राष्ट्रवादीतील मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठ पणाला लागलेली आहे. हे दोन्ही नेते एकमेकांचे राजकीय विरोधक मानले जातात. असे असतानाच आता याच नाशिकमधून मोठी माहिती समोर येत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या खेळीमुळे आता भुजबळ यांना चांगलाच धक्का बसला आहे.
भुजबळ यांचे कट्टर समर्थक शिंदे यांच्या शिवसेनेत
मिळालेल्या माहितनुसार मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक कैलास मुदलियार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुदलियार आणि शिंदे यांच्या शिवसेनेत चर्चा चालू होती. मुदलियार हे छगन भुजबळ यांचे जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. नाशिकमध्ये मुदलियार यांची ओळख ही भुजबळ यांचे कट्टर समर्थक अशीच होती. याच मुदलियार यांनी आता शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार?
भुजबळ यांना कोंडीत पकडण्यासाठी शिंदे सेनेने ही मोठी खेळी केली आहे. सध्या महायुतीचे घटकपक्ष असल्याने सध्या शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत चर्चा चालू आहे. परंतु मुदलियार यांना आपल्या पक्षात दाखल करून घेतल्याने भाजपा नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या हालचालींना वेग आल्याचे म्हटले जात आहे. मुदलियार यांच्या शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशावेळी मंत्री दादा भुसे उपस्थत होते. शिवसेनेच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
दरम्यान, मुदलियार यांचा शिवसेनेत प्रवेश होणे हा भुजबळ यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच मुदलियार यांच्यामुळे होणारी हानी भुजबळ कशी भरून काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुदलियावर हे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
