
‘आश्रम’ या वेब सीरिजचे तीन सिझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे तिन्ही सिझन ओटीटीवर चांगलेच गाजले. काही दिवसांपूर्वीच ‘आश्रम’च्या तिसऱ्या सिझनचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. यामध्ये बॉबी देओल, चंदन रॉय सान्याल आणि अदिती पोहणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहणकरने बरेच इंटिमेट सीन्स दिले आहेत. सहअभिनेता चंदनसोबतही तिचे काही इंटिमेट सीन्स आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चंदनने अदितीसोबत इंटिमेट सीन्स शूट करण्याचा अनुभव सांगितला आहे.
‘आश्रम’मधील इंटिमेट सीन्सबद्दल चंदन रॉय सान्याल म्हणाला, “सेटवर कोणीच नसायचं. फक्त आमचे डीओपी, दिग्दर्शक प्रकाश आणि दोन-तीन मुली असायच्या. अदिती स्वत: अत्यंत प्रोफेशनल अभिनेत्री आहे. सीन शूट करण्यापूर्वी मी तिच्याशी बरीच चर्चा करायचो. मी तिचा आत्मविश्वास जिंकायचा प्रयत्तन केला. कारण हे खूप गरजेचं असतं. हे जग महिलांसाठी कठीण आहे, ही गोष्ट तर मानावी लागेल. एका दृष्टीने पाहिलं तर हे जग महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी बनलेलंच नाही. त्यामुळे सर्वांत आधी तुम्हाला विश्वास, प्रेम आणि काळजीने काम करावं लागतं.”
‘आश्रम’च्या तिसऱ्या सिझनचा पहिला भागसुद्धा हिट ठरला होता. त्यानंतर आता दुसरा भागसुद्धा प्रदर्शित होताच हिट ठरला आहे. ही सीरिज एमएक्स प्लेयर आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘आश्रम 3’च्या दुसऱ्या भागाचा प्रीमिअर महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी रोजी झाला. या वेब सीरिजच्या इतर सिझनप्रमाणेच हा नवीन भागसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला आहे. प्रेक्षकांना बाबा निरालाच्या भूमिकेतील बॉबी देओलचं अभिनय खूप आवडलंय. तर अदिती पोहणकरने यात पम्मीची भूमिका साकारली आहे.
अदिती पोहणकरचा जन्म 31 डिसेंबर 1994 रोजी झाला. अदितीचे वडील मॅरेथॉन धावपटू होते, तर आई राष्ट्रीय स्तरावरील माजी हॉकीपटू होती. ‘आश्रम’शिवाय अदितीने ‘लई भारी’, ‘जेमिनी गणेशनम सुरुली राजनम’ यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलंय. ‘टॉपप्लेनेटइन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार 2019 पर्यंत अदितीची एकूण संपत्ती जवळपास 8 कोटी 75 लाख रुपयांच्या घरात होती. याशिवाय इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती जवळपास सहा ते नऊ लाख रुपयांपर्यंत कमाई करते.