तिला बॅग भरुन पाकिस्तानमध्ये पाठवा; अभिजीत बिचुकलेचा अभिनेत्रीवर निशाणा

अभिजीत बिचुकले सतत वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. नुकताच त्याने एका अभिनेत्रीवर टीका केली आहे.

तिला बॅग भरुन पाकिस्तानमध्ये पाठवा; अभिजीत बिचुकलेचा अभिनेत्रीवर निशाणा
Abhijeet Bichukale
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 06, 2025 | 12:16 PM

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध चालू होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता युद्धाचे ढग जास्तच गडद झाले आहेत. दरम्यान, एका बॉलिवूड अभिनेत्रीने पाकिस्तानच्या बाजूने वक्तव्य केले होते. ते पाहून अभिजीत बिचुकले संतापला आहे. त्याने या अभिनेत्रीला थेट पाकिस्तानमध्ये पाठवण्याची मागणी केली आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखी जाणारी राखी सावंत आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत, “नमस्कार, मी राखी सावंत, मी सत्य बोलेन आणि सत्याशिवाय काहीही बोलणार नाही. मी पाकिस्तानच्या लोकांसोबत आहे, जय पाकिस्तान” असे म्हटले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेने देखील राखीवर निशाणा साधला आहे.
वाचा: ६५ वर्षीय आजीचे २० वर्षीय तरुणावर प्रेम, सुनेने नको ते कृत्य करताना पकडलं अन्…

काय म्हणाला अभिजीत बिचुकले?

पत्रकारांशी संवाद साधताना अभिजीत बिचुकलेने राखीला थेट पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. ‘राखी सावंतने आताच्या आता बॅग भरुन पाकिस्तानला जावं. मी सरकारला सांगतो की राखी सावंतला देशद्रोही म्हणून जेलमध्ये टाका. नालायक राखी सावंतला पाकिस्तानला पाठवा. राखी सावंतवर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ असे अभिजीत बिचुकले म्हणाला.

पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या मुसक्या चांगल्याच आवळण्यात आल्या आहेत. सिंधू नदीचं पाणी बंद केल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. तसेच आयात निर्यात देखील बंद करण्यात आली आहे.