AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

६५ वर्षीय आजीचे २० वर्षीय तरुणावर प्रेम, सुनेने नको ते कृत्य करताना पकडलं अन्…

नऊ मुलांची आई २० वर्षांच्या तरुणावर प्रेम करायला लागली आहे. त्या तरुणाचे वय तिच्या मोठ्या मुलाच्या वयापेक्षाही कमी आहे. ही महिला आता आपला कुटुंब सोडून त्या प्रियकरासोबत राहण्याच्या हट्टावर अडून बसली आहे.

६५ वर्षीय आजीचे २० वर्षीय तरुणावर प्रेम, सुनेने नको ते कृत्य करताना पकडलं अन्...
CrimeImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 05, 2025 | 7:06 PM
Share

एका गावात ६५ वर्षीय आजी आणि २० वर्षीय तरुण यांच्यातील प्रेमप्रकरणाची चर्चा सध्या जोरात आहे. या प्रकरणाने संपूर्ण गावात खळबळ उडाली असून आजीने आपल्या सूनेच्या भावासोबत प्रेमसंबंध ठेवल्याचा आरोप आहे. सासू-सुनेच्या वादानंतर आजीने घर सोडले असून, ती आता तरुणासोबत लग्न करण्याचा हट्ट करत आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील एका गावात राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचे २० वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा सुनेने केला आहे. या तरुणाचे नाव राम (नाव बदलले आहे) असे आहे. सूनेच्या म्हणण्यानुसार, तिला काही महिन्यांपूर्वी आपल्या सासू आणि भावाच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती मिळाली. याबाबत तिने सासूला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याऐवजी सासूने तिच्याशी वाद घातला आणि घर सोडून गेली. सूनेच्या तक्रारीनंतर गावात पंचायत बसली, परंतु आजीने पंचायतीसमोरही तरुणासोबत लग्न करण्याचा हट्ट कायम ठेवला. सध्या ती गावात परतली नसून, तिच्या कुटुंबीयांनी ती तरुणासोबत राहत असल्याचे समजले. वाचा:

सासू-सुनेचा वाद

सूनेच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासूने तिच्या भावाला फूस लावून त्याच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिने सांगितले, “माझ्या सासूने माझ्या भावाला भेटायला बोलावले आणि त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मी याबाबत बोलले तेव्हा तिने माझ्याशी भांडण केले आणि घर सोडून गेली.” सूनेच्या तक्रारीनंतर गावातील काही लोकांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजीने कोणाचेही ऐकले नाही.

गावात खळबळ

या प्रकरणाने गावात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारचे प्रकरण यापूर्वी कधीही घडले नव्हते. काही जणांनी आजीच्या वागण्याला वयाचा परिणाम मानले, तर काहींनी याला प्रेमाचा मुद्दा मानले आहे. गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले, “ही गोष्ट आमच्या गावाच्या संस्कृतीला शोभत नाही. पण आजी आणि त्या तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.”

आजीचा हट्ट

सूत्रांनुसार, ६५ वर्षीय आजीने तरुणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने गावातील पंचायतीसमोर सांगितले की, “मला माझ्या आयुष्यात आता कोणाच्याही परवानगीची गरज नाही. मी माझ्या मनाप्रमाणे जगणार आणि रामसोबत लग्न करणार.” तिच्या या हट्टामुळे कुटुंब आणि गावकरी हैराण झाले आहेत.

पोलिसांत तक्रार नाही

या प्रकरणात अद्याप कोणतीही कायदेशीर तक्रार दाखल झालेली नाही. सूनेच्या म्हणण्यानुसार, ती पोलिसांत तक्रार दाखल करण्याच्या विचारात आहे, परंतु तिला कुटुंबाची बदनामी होण्याची भीती आहे. गावातील पंचायतीनेही या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजीच्या हट्टामुळे कोणताही तोडगा निघाला नाही.

मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.
पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, पण ठाकरे सेनेचा विरोध
पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, पण ठाकरे सेनेचा विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?.
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला.
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार.