हरयाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांची ‘दसवी’ अन् बारावीही! 87 व्या वर्षी पास होणाऱ्या ओम प्रकाश चौटाला यांच्यासाठी अभिषेकचं बच्चनचं खास ट्विट

| Updated on: May 10, 2022 | 6:11 PM

ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) हे वयाच्या 87 व्या वर्षी 10 वीनंतर 12 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. हरियाणा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चंदीगडमध्ये बारावीची मार्कशीटही सुपूर्द केली.

हरयाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांची दसवी अन् बारावीही! 87 व्या वर्षी पास होणाऱ्या ओम प्रकाश चौटाला यांच्यासाठी अभिषेकचं बच्चनचं खास ट्विट
87 व्या वर्षी पास होणाऱ्या ओम प्रकाश चौटाला यांच्यासाठी अभिषेकचं बच्चनचं खास ट्विट
Image Credit source: Twitter
Follow us on

कोणती गोष्ट शिकण्याला किंवा शिक्षणाला वयोमर्यादा नसते असं म्हणतात. याचीच प्रचिती हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना पाहून येते. वय हा फक्त आकडा असतो हेही त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. ओम प्रकाश चौटाला हे वयाच्या 87 व्या वर्षी 10 वीनंतर 12 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. हरियाणा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चंदीगडमध्ये बारावीची मार्कशीटही सुपूर्द केली. 2021 मध्ये ओम प्रकाश चौटाला यांनी हरियाणा ओपन बोर्ड अंतर्गत 12वीची परीक्षा दिली होती. मात्र ते अद्याप दहावीची इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने 5 ऑगस्ट रोजी त्यांचा निकाल रोखण्यात आला होता. 12वीचा निकाल घेण्यासाठी ते पुन्हा 10वीच्या इंग्रजी परीक्षेला बसले. त्यांना दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये 100 पैकी 88 गुण मिळाले आहेत. यावर आता अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री निम्रत कौर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दोघांनी ‘दसवी’ (Dasvi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचा विषय शिक्षणाशी संबंधित होता.

ओम प्रकाश चौटाला हे उत्तीर्ण झाल्याचं वृत्त शेअर करताना निम्रतने लिहिलं, ‘अत्यंत अद्भुत! वय हा केवळ आकडा आहे.’ तर अभिषेकनेही ‘बधाई’ असं लिहित #दसवी हा हॅशटॅग दिला. ओम प्रकाश हे सध्या राजकारणातही पूर्णपणे सक्रिय आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा हरियाणातील सर्व जिल्ह्यांना आणि मंडळांना भेटी दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

अभिषेक बच्चनचं ट्विट-

निम्रत कौरचं ट्विट-

तुषार जलोटा दिग्दर्शित ‘दसवी’ या चित्रपटात निम्रत कौर बिमला देवीच्या भूमिकेत आहे. पतीला अचानक तुरुंगात जावं लागल्याने ती मुख्यमंत्रिपद स्वीकारते. तुरुंगात असताना दहावीची परीक्षा देणाऱ्या राजकारण्याची भूमिका अभिषेकने साकारली आहे. अभिषेक आणि निम्रतसोबत या चित्रपटात यामी गौतमचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.