मी कोलमडून गेलेली, अभिषेकने मला…, करिश्मा कपूरने सांगितलं धक्कादायक सत्य, जाणून व्हाल थक्क

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर यांचं अचानक निधन झालं आणि अभिनेत्रीचं खासगी आयुष्य पुन्हा चर्चेत आलं. रिपोर्टनुसार, अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत साखरपुडा मोडल्यानंतर करिश्मा हिने संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही...

मी कोलमडून गेलेली, अभिषेकने मला..., करिश्मा कपूरने सांगितलं धक्कादायक सत्य, जाणून व्हाल थक्क
फाईल फोटो
| Updated on: Sep 02, 2025 | 9:54 AM

Abhishek Bachchan and Karisma Kapoor: अभिनेत्री करिश्मा कपूर आणि दिवंगत उद्योजक संजय कपूर यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर करिश्मा आणि संजय यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण घटस्फोटाच्या दरम्यान करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले होते. पण संजय कपूर याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी करिश्मा हिने अभिनेता अभिषेक बच्चन याचा डेट केलं होतं… एवढंच नाही तर, बच्चन कुटुंबाची भावी सून म्हणून जया बच्चन यांनी करिश्मा हिची घोषणा देखील केली. पण साखरपुड्यानंतर देखील दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

का मोडला करिश्मा आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा?

करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा झाला होता… असं देखील सांगितलं जातं. महानायक अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या दिवशी जया बच्चन यांनी करिश्मा हिची भावी सून म्हणून घोषणा देखील केली. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. यावर करिश्मा हिने भावना देखील व्यक्त केल्या होत्या…

अभिषेक याने मला एकटीला सोडलं…

संजय कपूर याच्यासोबत लग्न केल्यानंतर अनेक वर्षांनी करिश्माने अभिषेक याच्यासोबत नातं मोडल्याचा स्वीकार केला. एका मुलाखतीत अभिनेत्रीने त्यांच्या नात्याचं सत्य सांगितलं होतं. ‘ती वेळ माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी होती. त्या कठीण काळात अभिषेक याने मला एकटीला सोडलं…’

करिश्मा म्हणाली होती, ‘हे सर्वकाही जाणूनबुजून केलं होतं. मी पूर्णपणे कोलमडली होती… माझं दुःख सर्वांना सांगण्याची देखील माझी हिंमत नव्हती… त्या काळात मी आदरयुक्त शांतता निवडली… कारण मी अशा प्रकारची व्यक्ती आहे. मी नेहमीच कमी शब्द बोलणारी स्त्री आहे.’

‘मला असं वाटतं प्रत्येक जखमेचं औषध वेळ असते… मी खूप काही सहन केलं आहे. पण जे काही झालं त्याचा मी स्वीकार केला आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, जे व्हायचं आहे ते होणारंच आहे… मी माझ्या वाईट दिवसांचा सामना करण्यासाठी भावत्मकरित्या तयार नव्हती… आयुष्य तुम्हाला वेगवेगळ्या वाट्यांवर घेऊन जातं… तुम्हाला त्यावर फक्त चालायचं असतं… मी जे काही सहन केलं, ते दुसऱ्या कोणत्याच मुलीच्या नशिबात नको यायला… असं मला वाटतं…’ असं देखील करिश्मा म्हणाली होती.

करिश्मा हिच्यासोबत साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेक बच्चन याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये करिश्मा आणि ऐश्वर्या यांनी लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लेक आराध्या हिचं जगात स्वागत केलं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.