बच्चन कुटुंबाची सून बनण्यात ऐश्वर्याला नव्हता रस ? अभिषेकवरही क्रश नव्हता ?

Aishwarya Rai-Abhishek Bachchan Wedding Anniversary : माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने 20 एप्रिल 2007 रोजी बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाला आता 17 वर्ष पूर्ण झालीत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी बॉलिवूडमधील पॉवरफुल कपल म्हणून ओळखलं जातं. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या […]

बच्चन कुटुंबाची सून बनण्यात ऐश्वर्याला नव्हता रस ? अभिषेकवरही क्रश नव्हता ?
ऐश्वर्या रायने 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चनशी लग्न केलं.
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 1:20 PM

Aishwarya Rai-Abhishek Bachchan Wedding Anniversary : माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने 20 एप्रिल 2007 रोजी बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाला आता 17 वर्ष पूर्ण झालीत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी बॉलिवूडमधील पॉवरफुल कपल म्हणून ओळखलं जातं. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्याबाबत अनेक प्रश्न समोर येत आहेत.

2007 मध्ये ऐश्वर्या बनली बच्चन कुटुंबाची सून

2007 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून झाली. एकीकडे लोक अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या जोडीचे कौतुक करता, पण दुसरीकडे ऐश्वर्या आणि तिच्या सासूबाई जया बच्चन यांच्यात काहीही आलबेल नसल्याबद्दलही अनेक जण बोलताना दिसतात.

ऐश्वर्याला अभिषेकशी लग्न करायचं नव्हतं ?

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. चित्रपटांत काम करतानाच अभिषेक त्याची सहकलाकार असलेल्या ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता, पण दुसरीकडे ऐश्वर्याच्या बॉयफ्रेंडच्या यादीत अभिषेकचे नाव कुठेही नव्हतं. ऐश्वर्या रायला कधीच अभिषेक बच्चनसोबत लग्न करायचं नव्हतं अशी चर्चा होती.

ऐश्वर्याला अभिषेकवर कधीच क्रश नव्हता. ऐश्वर्या-अभिषेक जोडी बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे परंतु ही प्रेमकथा सुरुवातीच्या टप्प्यात फक्त एकतर्फी होती. 2016 मध्ये, करण छाब्राच्या टॉक शोमध्ये, ऐश्वर्याने स्वतः सांगितले होते की, तिला अभिषेक बच्चन किंवा तिच्यापेक्षा लहान असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर क्रश नव्हता. माझं लग्न अभिषेक बच्चनशी झालंय, माझा नवरा माझ्यापेक्षा लहान आहे, पण माझा त्याच्यावर कधीच क्रश नव्हता. आम्ही नेहमीच चांगले मित्र होतो. माझ्या शाळा-कॉलेजच्या दिवसातही मला माझ्यापेक्षा लहान मुलावर कधीच क्रश नव्हता. आणि माझं (अभिषेकशी) लग्न झालं तेव्हाही मला असं काही वाटलं नाही, असं ऐश्वर्या म्हणाली.

चित्रपटाच्या सेटवर झाली मैत्री

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांची पहिली भेट 2000 साली झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा दोघेही पहिल्यांदा भेटले होते, तेव्हा ऐश्वर्या राय दुसऱ्या व्यक्तीला डेट करत होती. मात्र, ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मैत्री झाली. यानंतर दोघांनी ‘कुछ न कहो’ चित्रपटात एकत्र काम केलं. 2006 हे सालं अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या आयुष्यातील अतिशय खास ठरलं. त्यावर्षी त्या दोघांनी गुरू, उमराव जान आणि धूम यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले. दोघांनाही या काळात एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाली. यानंतर दोघांनी 2007 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं.

Non Stop LIVE Update
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.