Bigg Boss OTT 2 | अभिषेक आणि मनीषा यांच्या जोडीची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, थेट म्हणाले, बाप आणि मुलीची जोडी, वाचा काय घडले?

बिग बाॅस ओटीटी 2 हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटी 2 धमाल करताना दिसत आहेत. आकांक्षा पुरी ही नुकताच बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडलीये. विकेंडच्या वारला सलमान खान याने चांंगलाच क्लास फलक नाज हिचा लावला होता.

Bigg Boss OTT 2 | अभिषेक आणि मनीषा यांच्या जोडीची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, थेट म्हणाले, बाप आणि मुलीची जोडी, वाचा काय घडले?
| Updated on: Jul 03, 2023 | 3:15 PM

मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss OTT 2) सध्या तूफान चर्चेत आहे. नुकताच आकांक्षा पुरी ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडलीये. कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक केल्याने आकांक्षा पुरी ही चार ते पाच दिवसांपासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होती. सलमान खान (Salman Khan) याने देखील आकांक्षा पुरी हिचा क्लास लावला होता. इतकेच नाही तर विकेंडच्या वारमध्ये सलमान खान याने फलक नाज हिचा देखील क्लास लावला. दुहेरी भूमिका बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात फलक घेत असल्याचे म्हटले. इतकेच नाही तर बिग बाॅसच्या घरातील सदस्यांच्या भांडणामध्ये त्यांच्या संगोपनावर अनेकदा फलक बोलताना दिसली त्यांच्या संस्काराबद्दल देखील बोलताना दिसली होती. यामुळे सलमान खान फलक नाज हिचा क्लास लावला.

बिग बाॅसचे एक असे घर आहे जिथे कोणते नाते कधी बदलतील हे सांगणे फार कठीण आहे. अभिषेक मल्हान आणि मनीषा राणी एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. दोघेही किचन परिसरात जद हदीद आणि जिया शंकर यांच्या जवळीकतेबद्दल बोलताना दिसले. विकेंडच्या का वारमध्येही सलमानने जद हदीद जोरदार क्लास लावला होता.

अभिषेक आणि मनीषा यांची जवळीकता पाहून अनेकांनी थेट मुलीची आणि बापाची जोडी देखील म्हटले आहे. यांची जवळीकता घरातील प्रत्येक व्यक्तीला खटकताना दिसत आहे. विशेष म्हणजे यांची जोडी सोशल मीडियावरही लोकांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळत आहे. अभिषेक आणि मनीषा यांचे जवळीक्ता अनेकांना आवडली नाहीये.

विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा फलक नाज हिला खडेबोल सुनावताना दिसला. घरातील जवळपास सर्वच सदस्य एकमेकांच्या मागे बोलत असल्याचे सलमान खान याने म्हटले आहे. यावेळी सलमान खान हा पूजा भट्ट हिचे नाव घेताना देखील दिसला. आकांक्षा पुरी हिच्या लिपलाॅकमुळे बिग बाॅसच्या निर्मात्यांच्या विरोधातच सोशल मीडियावर संतापाची लाट बघायला मिळाली.

काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस ओटीटी 2 मधून आलिया सिद्दीकी ही बाहेर पडली आहे. आलिया सिद्दीकी हिने शोमधून बाहेर पडल्यावर अनेक खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे सलमान खान याच्याबद्दल बोलताना देखील आलिया सिद्दीकी ही दिसली होती. आलिया सिद्दीकी हिचा बिग बाॅसच्या घरातील प्रवास अत्यंत छोठा ठरला.