लाडक्या लेकाच्या वाढदिवसाला शाहरुख गैरहजर; सुहाना अन् आई गौरीने केलं अब्रामसाठी खास प्लॅनिंग, होती या पदार्थांची मेजवानी

शाहरुख आणि गौरी खान यांच्या लाडक्या लेकाचा अब्रामचा बारावा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला आहे. या सेलिब्रेशनमध्ये शाहरुख आणि आर्यन खान गैरहजर होते. तर गौरी आणि सुहानाने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास प्लानिंग केले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लाडक्या लेकाच्या वाढदिवसाला शाहरुख गैरहजर; सुहाना अन् आई गौरीने केलं अब्रामसाठी खास प्लॅनिंग, होती या पदार्थांची मेजवानी
Abram Khan 12th Birthday,
Image Credit source: instagram
| Updated on: May 30, 2025 | 11:35 AM

शाहरुख खान आणि गौरी खानचा लाडका मुलगा अब्राम आता 12 वर्षांचा झाला आहे. 27 मे रोजी त्याने त्याचा 12 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

अब्रामच्या वाढदिवसाला शाहरूखच गैरहजर 

अब्रामच्या वाढदिवसाला त्याचे बाबा म्हणजे शाहरूखच उपस्थित नव्हता तसेच भाऊ आर्यन खानही उपस्थित नव्हता. पण आई गौरी खान आणि बहीण सुहानाने अब्रामसाठी खास प्लानिंग केलं होतं.

अब्रामच्या वाढदिवसाचे आई गौरी अन् बहीण सुहनाकडून खास प्लानिंग 

अब्रामचा वाढदिवस नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आर्ट्स कॅफेमध्ये साजरा करण्यात आला. तिथे फक्त काही खास लोक उपस्थित होते. अब्रामच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक समोर आली आहेत. जवळच्या लोकांसह झालेल्या पार्टीत शाहरुख आणि आर्यन दिसले नाहीत. कॅफेमध्ये एक छोटी पार्टी ठेवण्यात आली होती ज्यामध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी, अब्रामची आजी, आई गौरी खान, बहीण सुहाना आणि काही जवळचे लोकं तसेच त्याचे मित्रमंडळी उपस्थित होते.


पार्टीमध्ये केकसह अनेक खास पदार्थांची मेजवानी

पार्टीमध्ये केकसह अनेक खास पदार्थ असल्याचं दिसून आलं. शेफ अब्रामच्या वाढदिवसासाठी चविष्ट पदार्थ तयार करत असल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारची मिठाई देखील बनवलेली दिसत आहे. हा व्हिडिओ NMACC.india च्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. अब्रामसोबत बहीण सुहानाचा हात धरून पोज देतानाही दिसली. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘एनएमएसीसी आर्ट्स कॅफेच्या डिझायनर श्रीमती गौरी खान यांचे पुन्हा स्वागत करताना आनंद होत आहे.’

दरम्यान व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला पसंतीही दर्शवली आहे. तसेच काही युजर्स आर्यन आणि शाहरुख खानबद्दल विचारताना दिसत आहेत. कारण शाहरूख खानचे अब्रामवर किती प्रेम आहे हे सर्वांनाच माहित आहे. आणि लाडक्या लेकाच्या वाढदिवाला शाहरूखच उपस्थित नाहीये हे पाहून चाहते देखील थोडे नाराज झाले आहेत. तसेच शाहरूख अशा कोणत्या महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे की त्याला लाडक्या लेकाच्या वाढदिवसा दिवशी वेळ नाही मिळाला.