
महाराष्ट्राचे लाडके भावोजी , अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लाडका लेक सोहम बांदेकर (Soham Bandekar) हा आज (2 डिसेंबर) लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja birari) त्याचं शुभमंगल होत आहे. दोन-तीन दिवसांपासूनच त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली असून पूजाने खास मेहंदीचे फोटो शेअर करत त्यात सोहमला टॅग केलं होतं. तर काल त्यांची हळद आणि संगीत सेरेमनीचेही फोटो समोर आले. मुंबईत नव्हे तर लोणावळ्यात सोहम-पूजाचा विवाह होत असून या लग्नासाठी अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. सोहम-पूजाचा संगीत परफॉर्मन्सही व्हायरल झाला असून पांढऱ्या शुभ्र अटायरमध्ये दोघेही सुरेख दिसत होते.
मात्र या सगळ्यातं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते वर माय आणि वर पित्याने, अर्थात आदेश व सुचित्रा बांदेकर यांनी. लकांचं लग्न पुरेपूर एन्जॉय करणाऱ्या या दोघांनी त्यांच्या संगीत सोहळ्यातही मस्त परफॉर्मन्स दिला. त्यांचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.
लेकाच्या लग्नात थिरकले आदेश आणि सुचित्रा
गडद हिरव्या रंगाचा शर्ट घालून आलेले आंदेश बांदेकर आणि चंदेरी रंगाचा ड्रेस, खुले केस अशा अटायरमध्ये आलेल्या सुचित्रा बांदेकर यांनी स्टेजवर येताच आग लावली. दोघांनीही मिळून शानदार परफॉर्मन्स दिला. शाहरुख खान याच्या ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ या गाण्यावर दोघांचाही उत्तम डान्स पाहून सगळेच अवाक् झाले. टाळ्या, शिट्ट्यांनी परिसर दणाणून गेला. लाडक्या लेकाच्या लग्नाच त्यांचा हा परफॉर्मन्स सगळ्यांना लक्षात राहील असाच होता. “मुलाच्या लग्नात प्रचंड धमाल करणार” असं बांदेकरांनी आधीच सांगितलं होतं. या दोघांनी जोडीने शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.त्यांचा व्हिडीओही खूप व्हायरल झाला.
नेटकऱ्यांच्या भन्नााट कमेंट्स
दोघांच्याही डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांना तो खूपच आवडलाय . त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत. Arre wah बांदेकर शिकले कि नाचायला 👏👏👏, अशी मजेशीर कमेंट एकाने केली तर छान नाचले आदेश सर आणि सुचित्रा मॅम असं म्हणत दुसऱ्या युजरनेही दोघांचं भरभरून कौतुक केलं आहे. एकंदरच त्यांचा बिनधास्त अंदाज आणि दिलेखचक डान्स हा सगळ्यांच्या लक्षात राहील हे नक्कीच.