
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचं करिअर खूप शानदार होतं, पण त्यांच्या आयुष्यातही असे काही प्रसंग आले ज्यामुळे त्यांच्यासह कुटुंबालाही बरंच दु:ख सहन करावं लागलं. त्यांच्या आयुष्यातील अतिशय वेदनादायक घटनांपैकी एक म्हणजे ‘कुली’ च्या सेटवर झालेली दुर्घटना.. अभिनेता पुनीत इस्सार यांच्यासोबत एक सीन करताना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी नेमकं काय काय घडलं हे त्यांचा मुलगा, अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने नुकतच उघड केलं. संपूर्ण देश तेव्हा डिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होता आणि कुटुंबाला तेव्हा काय यातनांचा सामना करावा लागला, याबद्दल अभिषेक पहिल्यांदाच बोलला.
‘पीपिंग मून’ यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखती अभिषेक अनेक विषायंवर मोकळेपणे बोलला, तेव्हाच त्याला अमिताभ यांची दुखापत, ती घटना आणि कुटुंबावर पडलेला प्रभाव याबद्दल विचारण्यात आलं. त्या दिवासंबद्दल बोलताना अभिषेकने बरंच सांगितलं,. तेव्हा मी फक्त 6 वर्षांचा होतो, पण मला ती रात्र अगदी नीट लक्षात आहे. त्या रात्री मी बहीण श्वेतासोबत हॉटेलमध्ये होतो आणि बाबा शूटिंगवरून कधी परत येतात याची वाट पहात होतो,असं अभिषेक म्हणाला.
अमिताभ यांना दुखापत
“त्या रात्री जेव्हा ते (बाबा) परत आले तेव्हा त्यांच्यासोबत बरेच लोक होते, जे त्यांना चालण्यास मदत करत होते. मी त्यांना (वडीलांना) मिठी मारायला गेलो, पण त्यांनी मला दूर ढकलले. त्यांना दुखापत झालीये हे माल माहीत नवहतं, मला दूर ढकललं म्हणून मी रात्रभर त्यांच्यावर रागावलो होतो. त्यानंतरचं मला जास्त काही आठवत नाही. ” असं अभिषेकने सांगितलं. या घटनेचा आम्हा मुलाना धक्का बसू नये म्हणून रुग्णलयात नेताना आमची आई (जया बच्चन) वातावरण शक्यं तितकं हलकं, आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करायची असंही अभिषेकने नमूद केलं.
वडिलांना भेटायला जायचो तेव्हा…
“आम्ही जेव्हा जेव्हा बाबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचो, तेव्हा आई आणि बाबा त्याला एक खेळ बनवायचे. ते किती गंभीर आहे हे मला कळलं नव्हतं. जर तुम्ही वारंवार हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला काहीतरी गडबड आहे हे जाणवतं. पण आम्ही मास्त लावून आणि डॉक्टर-डॉक्टर खेळून दास्त खुश होतो. त्यांच्या (अमिताब बच्चन) शरीरात ड्रिप्स लावलेल्या असायच्या, पण ते म्हणायचे की हा ‘पतंग’ आहे ” असंही अभिषेरने नमूदल केलं.
जया बच्चन यांच्या डोळ्यात आला नाही एकही अश्रू,,
हे सर्व खेळ आणि गोष्टींनी मुलं तर खुश होती, पण या काळातही कुटुंब एकसंध राहिलं ते फक्त आईमुळे असं म्हणत अभिषेकने आईला क्रेडिट दिलं. “सर्व श्रेय माझ्या आईला जातं. मला आठवत नाही की मी तिला कधीही रडताना किंवा दुःखी होताना पाहिले आहे. तिने ते (वेदना, त्रास) सामान्य करण्याचा प्रयत्न केला. तिने तो कधीच वेदनादायक अनुभव ठरू दिला नाही, तेव्हा ती काय मनस्थितीतून गेली असेल मी याची फक्त कल्पनाच करू शकतो. अशा परिस्थितीत कुटुंबाला एकत्र ठेवणे हे नक्कीच कठीण काम असेल. ती फारशी वयस्कर नव्हती. ती तेव्हा साधारण 35 वर्षांची असेल आणि पदरात दोन लहान मुलं होती. तो काळ दुःखाचा होता हे मला आठवत नाही, कारण आमच्या पालकांनी कधीच तो तसा बनू दिला नाही ” अशा शब्दात अभिषकेन त्या वेदनादायक काळच्या आठवणी सांगितल्या.