अभिनेत्याचा विवाहबाह्य संबंधाबाबत मोठा खुलासा, म्हणाले पत्नीने रंगेहात पकडले होते

बॉलिवूडमध्ये से अनेक सेलिब्रिटी आहेत जे आपल्या अफेअरमुळे चर्चेत राहिले. पण काही कलाकार असे होते ज्यांचं लग्नानंतर ही अफेअर होतं. असाच एक दिग्गज अभिनेता लग्नानंतर ही अफेअर असल्याने अडचणीत आला होता. कारण पत्नीनेत त्याला रंगेहात पकडले होते. अभिनेत्याने स्वत:च याचा खुलासा केला आहे. कोण आहे तो अभिनेता?

अभिनेत्याचा विवाहबाह्य संबंधाबाबत मोठा खुलासा, म्हणाले पत्नीने रंगेहात पकडले होते
| Updated on: Nov 11, 2024 | 4:44 PM

बॉलिवूड आणि अफेअर हे लोकांसाठी काही नवं नाही. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांचे अफेअर होते. काहींचे लग्नापूर्वी होते तर काहींचे लग्नानंतर. याची यादी मोठी आहे. अनेकांचा अफेअरमुळे संसार मोडला. काही कलाकार आता पुन्हा रिलेशनशिपमध्ये आहेत तर काही सिंगल आहेत. या यादीत एक असं नाव आहे जो अभिनेता लग्नाच्या आधी अफेअरमुळे चर्चेत होता. या अभिनेत्याचं नाव आहे शत्रुघ्न सिन्हा. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचे अनेक चित्रपट हिट राहिले. त्यांची स्टाईल त्यांच्या चाहत्यांना आजही आवडते. त्यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवला. पण हेच शत्रुघ्न सिन्हा कधी काळी आपल्या अफेअरमुळे चर्चेत होते.

आज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा चित्रपटांपासून दूर असले तरी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल अनेक खुलासे वेगवेगळ्या मुलाखतींमधून करत असतात. ते नेहमीच पूर्ण प्रामाणिकपणे आपले मत व्यक्त करतात. त्यांनी त्यांच्याकडून झालेल्या काही चुकांचा देखील उल्लेख केला आहे. अभिनेता याआधी लग्नाबद्दल आणि प्रेम प्रकरणामुळे चर्चेत राहिले. आता अभिनेत्याने त्यांच्या लग्नाबाबत नवा खुलासा केला आहे.

विवाहबाह्य संबंधांवर खुली चर्चा

आपल्या विवाहबाह्य संबंधांबद्दल बोलताना अभिनेता सिन्हा म्हणालाे की, ही गोष्ट पुस्तकात मी लिहिली आहे. माझ्या पत्नीने मला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर मी यापुढे असे काही करणार नाही अशी शपथ तिने मला दिली. तेव्हापासून मी एक विवाहित पुरुष असल्याचे नेहमी लक्षात ठेवले. लग्नाआधी ते कोणाशी लग्न करतील याचा विचार करत नव्हते, तर ते कोणाशी लग्न करू शकत नाहीत याचा विचार करत होते. त्यांनी अनेक पर्याय खुले ठेवले होते.

स्वतःच्याच लग्नात 3 तास उशिरा

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा इंडस्ट्रीत त्या कलाकारांपैकी एक आहे जे नेहमी सेटवर उशिरा यायचेय. याचा अनेकदा त्यांनी उल्लेख केलाय. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनीही शत्रुघ्न सिन्हा यांच्या उशीरा येणाच्या सवयीचा खुलासा केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ते स्वत:च्या लग्नालाही ३ तास ​​उशिरा पोहोचले होते. त्यांनी पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्न केले. दोघेही एकदा चालत्या ट्रेनमध्ये भेटले होते. शत्रुघ्न सिन्हा आणि पुनम सिन्हा यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुलगी सोनाक्षी सिन्हा देखील एक अभिनेत्री आहे. जिचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे.