
साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात. विशेष म्हणजे त्याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळते. ज्युनिअर एनटीआर याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहतात. काही दिवसांपूर्वीच ‘देवरा’ चित्रपटाचे शूटिंग ज्युनिअर एनटीआर याने संपवले. 27 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आरआरआर चित्रपटाचे डायरेक्टर यांनीच हा चित्रपट बनवला आहे. यामुळे हा चित्रपट मोठा धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय. अभिनेता ज्युनिअर एनटीआर याच्याबद्दल एक अत्यंत मोठी बातमी येताना दिसत आहे. हेच नाही तर ज्युनिअर एनटीआर याचे चाहते चिंतेत आहेत.
चित्रपटाच्या शूटिंगवेळी ज्युनिअर एनटीआरला मोठी दुखापत झाल्याचे सांगितले जातंय. अॅक्शन सीन शूट करण्यात असताना ही दुखापत ज्युनिअर एनटीआर याला झालीये. ज्युनिअर एनटीआर हा हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये सुरू होते आणि यादरम्यानच ज्युनिअर एनटीआरला दुखापत झालीये.
ज्युनिअर एनटीआर याच्या हाताला ही दुखापत झालीये. यामुळे आता चित्रपटाचे शूटिंगही थांबवण्यात आले. हेच नाही तर डॉक्टरांनी ज्युनिअर एनटीआरला पुढील दोन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. यावरून हे स्पष्ट होते की, ज्युनिअर एनटीआर याची दुखापत मोठी आहे. ज्युनिअर एनटीआरच्या दुखापतीमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले.
आता हे स्पष्ट आहे की, ज्युनिअर एनटीआरला पुढील दोन महिने चांगला आराम करावा लागेल. आता दोन महिन्यांनंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये चित्रपटाचे शूटिंग परत सुरू होईल. मात्र, ज्युनिअर एनटीआर याच्या दुखापतीमुळे दोन महिने शूटिंग लांबणीवर पडले आहे. याच्या अगोदरही ज्युनिअर एनटीआर याच्या हाताला मोठी दुखापत झाली.
जिममध्ये व्यायाम करत असताना त्यावेळी ज्युनिअर एनटीआर याच्या हाताल दुखापत झाली होती. त्यावेळी त्याच्या हाताला प्लास्टर होते. देवरा पार्ट 1 बद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर याच्यासोबतच जान्हवी कपूर, सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा अत्यंत महागडा चित्रपट असून तब्बल 150 कोटी रुपये चित्रपटाचे बजेट आहे.