AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्राबाबू नायडू आणि ज्युनियर एनटीआर यांच्यात आहे खास नातं, तुम्हाला माहितीये का?

चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रप्रदेशमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे. चंद्राबाबू नायडू हे आंध्रप्रदेशातील मोठे नेते आहे. राजकारणात त्यांचा दबदबा आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या घराण्यासोबत त्यांचे खास संबंध आहेत.

चंद्राबाबू नायडू आणि ज्युनियर एनटीआर यांच्यात आहे खास नातं, तुम्हाला माहितीये का?
| Updated on: Jun 10, 2024 | 9:44 PM
Share

आंध्र प्रदेशात टीडीपी संपला अशी चर्चा असतानाच आंध्र प्रदेशच्या राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळालं. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत टीडीपीचे सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांनी कमबॅक केले आहे. टीडीपीला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. बहुमत मिळवत आता राज्यात देखील ते सरकार स्थापन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू किंगमेकरच्या भूमिकेत उदयास आले. त्यांचा हा विजय एखाद्या सिनेमाच्या कथेसारखा आहे. चंद्राबाबू नायडू यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध घराण्यातील व्यक्तींसोबत खास नातं आहे. चंद्राबाबू नायडू यांचे सासरे साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार होते. यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

चंद्राबाबू नायडू यांचे एनटी रामाराव यांच्याशी खास नातं

चंद्राबाबू नायडू हे तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) चे संस्थापक एनटी रामाराव यांच्याशी त्यांचा खोल संबंध आहे. एनटी रामाराव हे केवळ त्यांचे राजकीय गुरूच नव्हते तर त्यांचे सासरेही होते. एनटी रामाराव यांच्या पक्षात सामील झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी टीडीपीची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या मुलीसोबत ही लग्न केले.

चंद्राबाबू नायडू यांची पत्नी नारा भुवनेश्वरी हे तेलगू चित्रपट आणि राजकारणातील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेते आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) संस्थापक एनटी रामाराव यांची मुलगी आहे. त्या फक्त राजकारणात वेळ देत नाहीत तर त्या एक उद्योजिका देखील आहेत. हेरिटेज फूड्स कंपनीमध्ये त्यांचे शेअर्स आहेत.

भुवनेश्वरी आणि चंद्राबाबू नायडू कसे भेटले

दोघांची भेट ही राजकीय प्रवासात झाली. या दरम्यान दोघांंनी एकमेकांना आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडले. चंद्राबाबू यांचा विवाह 1981 मध्ये झाला. दोघांना नारा लोकेश नावाचा मुलगा आहे. नारा लोकेश राजकारणात आणि व्यवसायात दोन्हीकडे सक्रिय आहे.

ज्युनिअर एनटीआरशी संबंध

चंद्राबाबू नायडू आणि ज्युनियर एनटीआर यांचं देखील खास नातं आहे. चंद्राबाबू नायडू हे एनटी रामाराव यांची मुलगी नारा भुवनेश्वरींचे पती आहेत. एनटी रामाराव यांचे पुत्र नंदामुरी हरिकृष्ण यांचे नायडू हे मेहुणे आहेत. ज्युनियर एनटीआर म्हणजेच तारक हा नंदामुरी हरिकृष्णा यांचा मुलगा आहे. म्हणजेच तो एनटी रामाराव यांचा नातू आहे. त्यामुळे नारा भुवनेश्वरी हे ज्युनियर एनटीआरच्या मावशी आहेत. याचा अर्थ ते ज्युनियर एनटीआरचे काका आहेत. दोन्ही कुटुंबात आता चांगला समन्वय आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.