
प्रसिद्ध पब ‘ओली’ (Oly Pub) मध्ये एक धक्कादायक घटना घडली. बंगाली अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सायाक चक्रवर्ती (Sayak Chakraborty) हा शुक्रवारी रात्री मित्रांसोबत डिनरसाठी गेला होता. त्याने ‘मटण स्टेक’ ऑर्डर केले होते. पण त्याला मटणाऐवजी गोमांस (बीफ) खायला घातले आहे. सायक यांचा दावा आहे की, त्याला खाण्यापूर्वी हे माहिती नव्हते की हे मटण नसून गोमांस आहे.
घटना कशी घडली?
सायाक आणि त्यांच्या मित्रांनी फक्त एक मटण स्टेक ऑर्डर केले होते. पण टेबलवर एक अतिरिक्त मटण स्टेक आणून ठेवले गेले होते. जेव्हा सायक यांनी वेटरला विचारले, तेव्हा वेटरने सांगितले की, दोन स्टेक ऑर्डर केले होते – एक मटण आणि एक बीफ. हे ऐकून सायकला धक्क्याच बसला. ते ब्रा ह्मण असल्याने त्यांच्या धार्मिक भावनांना तीव्र धक्का बसला. त्यांनी म्हणाले, “तुम्हाला माहिती आहे का मी ब्राह्मण आहे? मी मटण मागितले आणि तुम्ही गोमांस दिले!”
सायाक यांनी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते वेटर आणि मॅनेजरकडून स्पष्टीकरण मागताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये मॅनेजर याला गंभीर चूक म्हणून माफी मागताना दिसत आहे.
पोलिसांची कारवाई
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोलकत्ता येथील पार्क स्ट्रीट पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि शनिवारी वेटर शेख नसीरुद्दीन याला भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २९९ अंतर्गत अटक केली. पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि रेस्टॉरंटमधील अन्न नमुन्यांची तपासणी केली जाऊ शकते.
व्हायरल व्हिडीओ आणि प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली. काहींनी सायक यांच्यावर सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा आणि राजकीय एजेंडा चालवण्याचा आरोप केला. वाद वाढताना पाहून सायक यांनी जुना व्हिडीओ डिलीट केला आणि नवे स्पष्टीकरण जारी केले.
सायाक यांच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे:
“माझा उद्देश हिंदू-मुस्लिम दंगे भडकवणे नव्हता. माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत आणि मी त्यांच्या घरी ईद साजरी करतो. माझी प्रतिक्रिया पूर्णपणे भावनिक होती कारण चूकून खाल्ल्यामुळे माझा धर्म भ्रष्ट झाला. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.”
ते पुढे म्हणाले, “माझी नाराजी कोणत्या धर्माविरुद्ध नाही, तर रेस्टॉरंटच्या निष्काळजीपणाविरुद्ध आहे. रात्रीच्या वेळी गर्दी असते, पण अशा चुका दुर्लक्षित करता येत नाहीत. भविष्यात इतर कोणाच्याही बाबतीत असे होऊ शकते.” या घटनेमुळे सोशल मीडियावर आणि स्थानिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.