Sidharth Malhotra Father Death : मी आज जो काही आहे, फक्त तुमच्यामुळेच… वडिलांच्या जाण्याने सिद्धार्थ मल्होत्रा शोकाकूल

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि त्याच्या कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. वडिलांच्या जाण्याने भावूक झालेल्या अभिनेत्याने एक इमोशनल पोस्ट लिहीत त्यांच्यासोबतच काही आठवणी शेअर केल्या, त्यांना अखेरचा निरोप दिला.

Sidharth Malhotra Father Death : मी आज जो काही आहे, फक्त तुमच्यामुळेच... वडिलांच्या जाण्याने सिद्धार्थ मल्होत्रा शोकाकूल
सिद्धार्थ मल्होत्रा याला पितृशोक
Image Credit source: social media
| Updated on: Feb 18, 2026 | 8:33 AM

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यांसाठी एका वाईट बातमी आहे. सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा यांचं निधन झालं, झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून वडीलांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली. वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी सिद्धार्थ त्याच्या कुटुंबासह तातडीने दिल्लीत पोहोचला. तिथेच सुनिल मल्होत्रा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या कठीण काळात कुटुंबाची साथ देण्यासाठी, त्यांन आधार देण्यासाठी सिद्धार्थ काही दिवस दिल्लीतच असेल. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांचे शनिवारी, 14 फेब्रुवारी रोजी निधन झाले. मात्र, ही बातमी काल सार्वजनिक करण्यात आली. वडिलांच्या जाण्यानंतर भावूक झालेल्या सिद्धार्थने त्यांच्यासाठी एक मोठ्ठी पोस्ट लिहीली तसेच काही फोटोही शेअर केले.

वडिलांच्या आठवणीत सिद्धार्थ भावूक

सुनील मल्होत्रा ​​हे मर्चंट नेव्हीमध्ये माजी कॅप्टन होते. सिद्धार्थ त्यांच्या खूप जवळचा होता. वडिलांच्या निधनानंतर या अभिनेत्याने एक भावनिक पोस्ट व काही फोटो शेअर केले आहेत. ‘ ते प्रामाणिक आणि सुसंस्कृत माणूस होतो. ते कधीही तडजोड न करता त्याच्या मूल्यांनुसार जीवन जगले. शिस्तप्रिय होता, पण कठोर नव्हते. त्यांच्याकडे ताकद होती, पण अहंकार नव्हता. आयुष्त त्यांनी अनेक परीक्षांचा, कठीण काळाचा सामना केला पण ते नेहमीच सकारात्मक राहिले. मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून समुद्राचे नेतृत्व करण्यापासून ते आजाराला शांतपणे आणि धैर्याने तोंड देण्यापर्यंत, त्यांनी कधीही हार मानली नाही, कधीही त्यांची प्रतिष्ठा गमावली नाही.” असं सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहीलं.

 

तुमचा प्रामाणिकपणा हाच माझा वारसा

“बाबा, तुमचा प्रामाणिकपणा हा माझा वारसा आहे. तुमची ताकद मला दररोज मार्गदर्शन करते. तुमची सकारात्मकता आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते. तुम्ही आम्हाला झोपेत शांतपणे सोडून गेलात, पण तुम्ही गेल्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळे आहे. आणि मी नेहमीच तुमचे नाव, तुमची मूल्यं पुढे घेऊन जाईन. लव्ह यू पापा” असंही त्याने लिहीत वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा वडिलांशी खूप क्लोज होता, तो अनेकदा त्यांच्याबद्दल बोलायचा. एका मुलाखतीत त्याच्या वडिलांबद्दल बोलताना तो म्हणाला होता, ‘माझे वडील माझे खरे हिरो आहेत, माझे सर्वात लाडके हिरो आहेत.’ सिद्धार्थसाठी त्याचे वडील हे, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार होते. त्याचे वडील सुनील मल्होत्रा ​​हे मर्चंट नेव्हीमध्ये माजी कॅप्टन होते. सिद्धार्थच्या सांगण्यानुसार, त्याच्या वडिलांनीच त्याला शिस्त आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व शिकवलं होतं.