Tiger Shroff : मोठी बातमी, टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, पोलिस तपास सुरू

Firing on Tiger Shroff : बॉलिवूडमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे.

Tiger Shroff : मोठी बातमी, टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, पोलिस तपास सुरू
| Updated on: Oct 18, 2026 | 8:02 PM

बॉलिवूडमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. जुहू परिसरात गोळीबार करण्यात आला. अभिनेता फुटबॉल मॅच खेळून घरी जात असताना अभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. अभिनेत्यासह दोन जण जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात व्यक्तींकडून अभिनेत्यावर गोळीबार करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

 

Loading...

जुहू येथील पुष्पा पार्क या परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. तीन अज्ञात व्यक्ती दुचाकीवर आले होते. या तिघांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आता अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून पोलीस तपास करत आहेत. ते तिघे जण नेमके कोण आहेत? याचा शोध घेतला जातोय. टायगरवर गोळीबार झालेला नसून अभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. अभिनेता सुरक्षित असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

 

काय म्हणाले सचिन सावंत?

टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणी काँग्रेस नेते सचिन सावंत टीव्ही9 सोबत झालेल्या संवादात म्हणाले की, ‘हे अत्यंत भयानक आहे. मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा याअगोदर कधी झाला नव्हता, जो आता महायुतीच्या काळात झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, सलमानच्या घरावर गोळीबार झाला, निर्मात्यांना धमक्या येतायत, पूर्वी आम्ही म्हणायची महाराष्ट्राचा बिहार झालाय, आता ते खरंच झालं आहे. हे सरकारचं पाप आहे, त्यामुळे आम्ही यांचा निषेध करतो. मुंबई ही देशात सुरक्षित मानली जायची. पण, आज ही अवस्था झाली आहे. हे भयानक आहे. संपूर्ण जगामध्ये बॉलिवूड नावाजलेलं आहे.’

 

दरम्यान, सलमान खानवर गोळीबार त्यानंतर कलाकारांना मिळणाऱ्या धमक्या यांमुळे कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us