वयाच्या 25 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास; निधनाच्या काही तासांपूर्वी तिचं…

| Updated on: Mar 26, 2023 | 3:08 PM

वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं स्वतःचं जीवन; निधनाच्या काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत...

वयाच्या 25 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास; निधनाच्या काही तासांपूर्वी तिचं...
Follow us on

वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवलं आहे. अभिनेत्रीने वयाच्या २५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आकांक्षाने आपला जीव घेतला. आकांक्षा दुबे टिक टॉक स्टार म्हणून स्वतःच्या करीअरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पण तिने अचानक टोकाचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या २५ वर्षी आकांक्षाला भोजपुरी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली. अभिनेत्रीने पवन सिंह याच्यासोबत देखील काम केलं.

आज सकाळी म्युझिक टोन नावाच्या यूट्यूब चॅनलवर आकांक्षा दुबेचं शेवटचं गाणं ‘ये आरा कभी हरा नही’ प्रदर्शित झालं आहे. अभिनेत्री शेवटच्या गाण्यात आकांक्षा दुबे पवन सिंगसोबत दिसली होती. आकांक्षा दुबे भोजपुरी चित्रपटसृष्टीत यशाची शिडी चढत होती. अशात अभिनेत्रीचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

आकांक्षा दुबेच्या शेवटच्या गाण्याचे बोल जाहिद अख्तर आणि इमामुद्दीन यांनी लिहिले आहेत. या गाण्याचं संगीत प्रियांशू सिंग यांनी दिलं. गाण्यात आकांक्षा दुबे हिने लाल रंगाचा ड्रेस घातला केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

आकांक्षा दुबे हिच्यासोबत नक्की असं काय झालं ज्यामुळे अभिनेत्रीने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीच्या निधनाचं नक्की कारण काय’? हे चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. आकांक्षा दुबेच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मेरी जंग मेरा फैसला सिनेमातून आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘मुझसे शादी करोगी’ (भोजपुरी), वीरों के वीर, फायटर किंग, कसम पैदा करने की 2 यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आकांक्षाच्या आत्महत्येनं भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.