
Anusha Dandekar बॉलिवुड हे असे क्षेत्र आहे, जिथे कधी काय होईल हे सांगता येत नाही. इथं अनेकदा अभिनेता-अभिनेत्री एकमेकांच्या प्रेमात पडतात. अगोदर ते एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याची शपथ घेतात. पण नंतर पुढच्याच काही महिन्यांत त्यांचे ब्रेकअप झालेले पाहायला मिळते. करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर हे कपलदेखील असेच आहे. या कधीकाळी हे कपल मनोरंजन क्षेत्रात फार प्रसिद्ध होते. नंतर मात्र त्यांचे ब्रेकअप झाले. दरम्यान, आता अनुषा दांडेकरने करण कुंद्राबाबत मोठा खुलासा केला आहे.
अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप होऊन बराच काळ लोटला. सध्या करण कुंद्रा तेजस्वी प्रकार या अभिनेत्रीच्या प्रेमात आहे. आता अनुषा दांडेकरने करण कुंद्राबाबत मोठा खुलासा केला आहे. अनुषा दांडेकरच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर भाष्य केलंय. तिने कुठेही करण कुंद्राचे नाव घेतलेले नाही. मात्र ती करणबद्दलच बोलत होती, असे म्हटले जात आहे.
एका डेटिंग अॅपने त्यांचा प्रचार करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर या करारात तिने तिच्या बॉयफ्रेंडलाही घेतले. दोघेजण मिळून करारानुसार या डेटिंग अॅपचा प्रचार करायचा, असे ठरले. त्यानंतर माझ्या एक्स बॉयफ्रेंडने अन्य मुलींशी बोलण्यासाठी त्या डेटिंग अॅपचा वापर सुरू केला. त्यानंतर तो मला धोका देत आहे, असे समजून चुकले असे अनुषाने सांगितले आहे. माझ्या एक्स बॉयफ्रेंडचे मुंबईतील अनेक मुलींशी अफेअर होते, असाही खळबळजनक दावा केला आहे.
दरम्यान, अनुषाने आपल्या या मुलाखतीत एक्स बॉयफ्रेंबडबद्दल बोलताना कोणाचेही थेट नाव घेतलेले नाही. मात्र तिने केलेले वर्णन आणि भाष्यांवरून ती करुण कुंद्राबाबत बोलत असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे हा अंदाज खरा असेल तरआता अनुषाच्या दाव्यानंतर करण कुंद्रा काही प्रतिक्रिया देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.