AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

43 वर्षांपूर्वी सनी देओलच्या या चित्रपटाने केला होता बॉक्स ऑफिसवर कब्जा, 3 कोटी बजेटमध्ये केली 130000000 कोटींची कमाई

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या 'बॉर्डर 2' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अशातच त्याच्या पहिल्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. ज्याने 3 कोटी बजेटमध्ये 13 कोटींची कमाई केली होती.

43 वर्षांपूर्वी सनी देओलच्या या चित्रपटाने केला होता बॉक्स ऑफिसवर कब्जा, 3 कोटी बजेटमध्ये केली 130000000 कोटींची कमाई
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 09, 2026 | 12:33 PM
Share

Bollywood Actor : सनी देओल सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव ठरले आहे. ‘बॉर्डर-2’च्या रिलीजपासून त्याच्या नावाचीच हवा आहे. चित्रपटातील त्याची दमदार अभिनयशैली, बुलंद संवादफेक आणि देशभक्तीने ओतप्रोत असलेली भूमिका पाहून प्रेक्षकांनी पुन्हा एकदा ‘ये ढाई किलो का हाथ’ स्वीकारला आहे. आपल्या सेकंड इनिंगमध्ये सनी देओल अधिक आक्रमक आणि प्रभावी ठरत असल्याचे या चित्रपटाने सिद्ध केले आहे.

‘बॉर्डर-2’ला प्रदर्शित होऊन 16 दिवस पूर्ण झाले असले तरी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अजूनही सुरूच आहे. चित्रपट ट्रेंडवर नजर ठेवणाऱ्या सॅकनिल्क या वेबसाइटनुसार, अनुराग सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 302 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर-2’चाच दबदबा पाहायला मिळतो आहे.

सनी देओलच्या पहिल्या चित्रपट ‘बेताब’बद्दल

‘बॉर्डर-2’च्या यशापासून थोडे मागे वळून पाहिले तर आठवण होते सनी देओलच्या पदार्पणाच्या चित्रपटाची ‘बेताब’ची. सन 1983 मध्ये आलेल्या या चित्रपटातून सनी देओलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्या सोबत अमृता सिंह मुख्य भूमिकेत होत्या. ‘बेताब’ ही एक तरुण प्रेमकहाणी होती आणि तिचे संगीतही प्रचंड लोकप्रिय झाले होते.

जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या आणि राहुल रवैल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने सनी देओलला रातोरात स्टार बनवले. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बेताब’चा बजेट सुमारे 3 कोटी रुपये होते. तर विकिपीडियावर उपलब्ध आकडेवारीनुसार, या चित्रपटाने 13.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच, चित्रपटाने आपल्या बजेटच्या जवळपास तीन पट नफा कमावला होता. त्यामुळेच सनी देओलच्या स्टारडमची पायाभरणी याच चित्रपटातून झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

2026 ची सुरुवात दमदार, पुढेही मोठे प्रोजेक्ट्स

2026 ची सुरुवात सनी देओलसाठी ‘बॉर्डर-2’मुळे अतिशय धमाकेदार ठरली आहे. मात्र इथेच त्याची वाटचाल थांबणारी नाही. येत्या काळात सनी देओल अनेक मोठ्या आणि वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

‘इक्का’ हा चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘लाहोर 1947’ देशभक्ती आणि इतिहासावर आधारित मोठा प्रोजेक्ट. ‘रामायण’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटात सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असून या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Follow Us
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...