अरे ही काय रोज नाचते म्हणणाऱ्यांना दीपिका सिंह हिने खडसावले, दिया और बाती हम अभिनेत्रीने चक्क

टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका सिंह ही टीव्ही मालिकांपासून गेल्या काही वर्षांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही दीपिका सिंह ही चर्चेत असते. दीपिका सिंह ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चाहत्यांसाठी डान्सचे खास व्हिडीओ शेअर करते.

अरे ही काय रोज नाचते म्हणणाऱ्यांना दीपिका सिंह हिने खडसावले, दिया और बाती हम अभिनेत्रीने चक्क
| Updated on: Dec 04, 2023 | 6:09 PM

मुंबई : दिया और बाती हम या मालिकेने मोठा काळ गाजवला आहे. दिया और बाती हम मालिकेत संध्या बिननीच्या भूमिकेत असलेली दीपिका सिंह ही कायमच चर्चेत असते. दिया और बाती हम मालिकेनंतर दीपिका सिंह मोठ्या पडद्यावर दिसली नाही. मात्र, आजही लोकांना संध्या बिननीचे पात्र प्रचंड आवडते. दीपिका सिंह हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दिया और बाती हम या मालिकेतून दीपिका सिंह हिला खरी ओळख मिळाली आहे. दीपिका सिंह हिच्या पुनरागमनाची चाहते हे आतुरतेने वाट पाहत आहेत.

दीपिका सिंह जरी आज कोणत्या मालिकेत नसली तरीही ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच दीपिका सिंह खास व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. विशेष: दीपिका सिंह ही सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करते. मात्र, दीपिका सिंह हिचे हे व्हिडीओ अनेकांना अजिबातच आवडत नाहीत.

इतकेच नाही तर व्हिडीओमुळे दीपिका सिंह ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील दिसते. आता नुकताच याबद्दल दीपिका सिंह हिने खुलासा केलाय. दीपिका सिंह म्हणाली की, मी गेल्या काही दिवसांपासून माझ्या परीक्षेमध्ये बिझी होते. मात्र, आता मी परत एकदा सोशल मीडियावर परत आलीये. मुळात म्हणजे मी जेंव्हा क्लासिकल डान्सचे व्हिडीओ शेअर करते, त्यावेळी लोक वाईट कमेंट करत नाहीत.

मी ज्यावेळी काहीतरी वेगळी डान्सचे व्हिडीओ किंवा गाण्याचे व्हिडीओ शेअर केले की, मला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मुळात म्हणजे या ट्रोलिंगचा मला काहीच परिणाम पडत नाही. लोक मी इतर व्हिडीओ शेअर केल्यावर म्हणतात की, तुला दुसरे काहीही काम नाहीये का? नाचल्याशिवाय… मला डान्स करण्यास आवडते आणि ते व्हिडीओ अपलोड करायला देखील. बाकी गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होत नाही.

मी काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर होते. मी माझ्या परिक्षेत बिझी होते. आता मी त्यामधून फ्री झाले आहे. यामुळे परत एकदा मी तुम्हाला सोशल मीडियावर दिसेल. दीपिका सिंह हिने आपल्या सहकारी कलाकारावर अत्यंत गंभीर आरोप हे केले होते. ज्यानंतर मोठा वाद हा बघायला मिळाला. दीपिका सिंह सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.