एकता कपूर काय पाहून काम देते? या मुस्लिम अभिनेत्रीने केली पोलखोल; बॉलिवूडमध्ये खळबळ

टीव्ही इंडस्ट्रीतील एक अभिनेत्री नवीन कास्टिंग पद्धतींवरून संतापली आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने खुलासा केला आहे की, एका प्रोडक्शन हाऊसने तिला भूमिका देण्यापूर्वी तिच्या जन्माची माहितीसुद्धा मागितली होती.

एकता कपूर काय पाहून काम देते? या मुस्लिम अभिनेत्रीने केली पोलखोल; बॉलिवूडमध्ये खळबळ
सांकेतिक फोटो
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 17, 2026 | 12:56 PM

रुपेरी पडद्यावर स्थान मिळवण्यासाठी कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. काही कलाकारांना अगदी सहज चित्रपट किंवा मालिकांमध्ये भूमिका मिळते तर काहींना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. फिल्म इंडस्ट्रीपासून ते टीव्हीपर्यंत, कास्टिंगबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित होत राहिले आहेत. आता अलीकडेच एक प्रसिद्ध अभिनेत्रीने टीव्ही इंडस्ट्रीतील कास्टिंग प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अभिनेत्रीने थेट टीव्ही क्विन एकता कपूर कास्टिंग कशा प्रकारे करते हे उघड केलं आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? ती नेमकं काय म्हणाली? चला जाणून घेऊया…

आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉसमधील स्पर्धक फलक नाज आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि नियमितपणे फोटो-व्हिडिओ शेअर करताना दिसते. अलीकडेच तिने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. या पोस्टमध्ये फलक नाजने टीव्ही इंडस्ट्री आणि प्रोडक्शन हाऊसबाबत बोलताना गंभीर आरोप केले. तिने कोणाचे नाव न घेता एका प्रोडक्शन हाऊसवर गंभीर आरोप लावले आहेत.

फलक नाजने कोणाला टार्गेट केले?

फलक नाजने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून सांगितले की, “पूर्वी इंडस्ट्रीत तुम्हाला तुमच्या टॅलेंट आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर काम मिळत असे. आता एक नवीन काळ सुरू झाला आहे. आता इंस्टाग्राम फॉलोअर्स पाहून आणि जन्मकुंडली पाहून तुम्हाला काम दिले जाईल. एक खूप हिट प्रोड्यूसर आहे, त्यांच्याकडे असेच चालते.” तिने कोणाचे नाव घेतले नाही, पण अनेक सोशल मीडिया युजर्सनी ताबडतोब अंदाज लावला की तिचा इशारा एकता कपूर यांच्याकडे आहे, ज्यामुळे ऑनलाइन जोरदार चर्चा सुरू झाली.

फलक नाजला आलेला कॉल

टीव्ही अभिनेत्रीने पुढे सांगितले, “काल मला एक कॉल आला होता. मी त्या प्रोडक्शन हाऊसचे नाव घेणार नाही. ते खूप जुनेही नाहीत आणि पूर्ण नवीनही नाहीत. त्यांनी मला सांगितले की एक नवीन शो येत आहे, तो या चॅनेलवर येईल, हे प्रोडक्शन हाऊस आहे आणि हे कॅरेक्टर आहे. मी म्हणाले, ठीक आहे, आता पुढे काय करायचे? सामान्यतः अभिनेत्यांना लूक टेस्टसाठी, मॉक टेस्टसाठी किंवा रेफरन्स ऑडिशनसाठी बोलावले जाते. पण मला माझी बर्थ डेट, जन्मस्थान आणि वेळ पाठवण्यास सांगितले गेले.” अभिनेत्रीने सांगितले की त्या वेळी तिने ती माहिती पाठवली, पण नंतर विचार करून तिला खूप राग आला.

लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

फलकचा हा व्हिडीओ आल्यानंतर सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आणि लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. एका रेडिट युजरने लिहिले, “एकता आता कुंडलीच्या आधारावर अभिनेत्यांना कास्ट करत आहेत.” दुसऱ्या युजरने कमेंट केले, “कदाचित म्हणूनच एकताने तान्या मित्तलला रोल ऑफर केला? कदाचित तिची कुंडली खूप मजबूत आहे, कारण खरं सांगू तर मला तिचा अभिनय अजिबात आवडत नाही, अगदी जाहिरातींमध्येही नाही.”

फलक नाजने या प्रकाराला “बकवास” आणि “नॉन्सेंस” म्हणून नाकारले आहे. ती म्हणाली की, “अशा प्रकारची बकवास मी मान्य करणार नाही. अभिनेते म्हणून आम्ही आमच्या क्राफ्टचा आदर करतो, त्याचा अपमान होऊ देणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याने टीव्ही इंडस्ट्रीतील कास्टिंग प्रक्रियेवर नवीन चर्चा सुरू झाली आहे, आणि अनेकांनी एकता कपूर यांच्याकडे इशारा करून या प्रकरणाला जोडले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us