27 वर्ष मोठ्या नवऱ्याकडून छळ आणि यातना… 4 मुलांच्या बापाची झाली दुसरी बायको, कोण आहे ‘ही’ आयटम गर्ल?

27 वर्ष मोठ्या नवऱ्याने अभिनेत्रीचा केला फक्त छळ... अखेर तिच्यावर 4 मुलांच्या बापाची दुसरी पत्नी होण्याची आली वेळ... आज कसं जगतेय आयुष्य, कोण आहे 'ती' आयटम गर्ल... जाणून घ्या तिच्याबद्दल सर्वकाही...

27 वर्ष मोठ्या नवऱ्याकडून छळ आणि यातना... 4 मुलांच्या बापाची झाली दुसरी बायको, कोण आहे ही आयटम गर्ल?
अभिनेत्री हेलन
| Updated on: Apr 29, 2026 | 11:18 AM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक यातना सहन केल्या. अभिनेत्री प्रोफेशनल आयुष्यात तर यशाच्या शिखरावर चढल्या, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी खूप काही सहन केलं. एका अभिनेत्रीने तर फार कमी वयात स्वतःपेक्षा 27 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्याने अभिनेत्रीवर अनेक अत्याचार केले. अखेर अभिनेत्री नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर, एक वेळ अशी आली, अभिनेत्रीला चार मुलांच्या बापासोबत दुसरा संसार थाटावा लागला… सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री हेलन आहे. हेलन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा हेलन लोकप्रिय आयटन गर्ल होत्या, तर सलीम खान यांच्यासोबत हेलन यांनी दुसरा संसार थाटला.

हेलन यांचं पूर्ण नाव हेलेन ऐन हेलन ऐन रिचर्डसन असं होतं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि बर्मावरील जपानी आक्रमणामुळे त्याच्या कुटुंबाला पलायन करण्यास भाग पडलं. त्यामुळे हेलन त्यांच्या कुटुंबासह भारतात स्थलांतरित झाल्या.

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना शिक्षण देखील घेता आलं आहे. अखेर त्यांनी बँकग्राउंड डान्सर म्हणून फिल्मी विश्वात पदार्पण केलं. हळू – हळू हेलेन यांना मेहनतीचं फळ मिळू लागलं होतं. अशात हेलन यांनी स्वतःपेक्षा 27 वर्षांनी मोठे दिग्दर्शक प्रेम नारायण अरोरा यांच्यासोबत लग्न केलं. हेलन यांनी लग्न तर केलं. पण त्यांच्या वाट्याला फक्त निराशाच आली.

वैवाहिक आयुष्यात हेलन जेव्हा मोठ्या अडचणींचा सामना करत होत्या, तेव्हा बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय लेखक सलीम खान यांनी हेलन यांची मदत केलं… याच दरम्यान, सलीम आणि हेलन यांचं नातं देखील घट्ट झालं. अखेर दोघांनी लग्न केलं. तेव्हा सलीम विवाहित आणि चार मुलांचे वडील होते. हेलन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर खान कुटुंबात मोठं वादळ आलं पण वेळेनुसार ते शमलं देखील. आज हेलन सलीम खान यांच्या पहिल्या कुटुंबियांसोबत आनंदाने जगत आहेत.

हेलन आणि सलीम यांच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर, दोघांनी त्यांच्या मुलांना जन्म दिला नाही. तर अर्पिता हिला दत्तक घेतलं. सलीम खान त्यांच्या कुटुंबापासून दुरावणार नाहीत, याची हेलन यांनी कायम काळजी घेतली. याच कारणामुळे सलीम यांच्या पहिल्या पत्नी सलमा खान त्यांचा आदर करतात.

Follow Us