AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयल हिने इंदुरमधील सोनम रघुवंशीची आठवण करून दिली. सियाने प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला. तपासादरम्यान एक धागा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे आणि या घटनेला नाट्यमय वळण मिळाले. पोलिसांना एक क्लू मिळाला हे प्रकरण समोर आले.

2004 कॉल्स... 238 तास गप्पा... चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
| Updated on: Jun 23, 2026 | 10:11 PM
Share

Ketan Agarwal Lohgad Murder Case: ऐतिहासिक लोहगड किल्ले परिसरात 18 जून रोजी 26 वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे कालपर्यंत मानल्या जात होते. पण हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही याचा अंदाज पोलिसांना अगोदरच आला होता. एका योजना आखून अगदी थंड डोक्याने हा खून केल्याचा पोलिसांना अंदाज आला होता. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू झाला. डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि किल्ल्यावरील घडामोडींनी तपासाची दिशा बदलली. ही मर्डर मिस्ट्री पोलिसांनी एका क्लू आधारे सोडवली. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचा डाव पोलिसांनी उघड केला.

सिया गडबडली नि पकडल्या गेली

केतन अग्रवालचा अंत्यसंस्कार झाला. त्यानंतर चार दिवसांनी सिया गोयल ही अग्रवाल कुटुंबाच्या भेटीसाठी आली. केतनच्या बहिणीने सियाला काही प्रश्न विचारले. तेव्हा तिचे उत्तर संशयास्पद वाटले. केतनच्या बहिणीचा सियावर संशय बळावला. तिने कुटुंबासोबत ही बाब शेअर केली. त्यांनी पोलिसांशी चर्चा केली आणि प्रकरणाची दिशा बदलली. तपास पुढे सरकला तसा सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांमध्ये गेल्या सहा महिन्यात जवळपास 238 तास फोनवर गप्पा झाल्याचे समोर आले. दोघांमधील या दीर्घ संभाषणाने तपास यंत्रणांचे लक्ष वेधले.

आणि मिळाला तो क्लू

पोलिसांनी तपासात 18 जून रोजी, केतनच्या खूनाच्या दिवशीच्या घडामोडींवर लक्ष केंद्रीत केले. त्यावेळी चेतन चौधरी याचा पोलिसांना एक क्लू मिळाला. सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटापर्यंत चेतन चौधरीचे इंटरनेट बंद असल्याचे समोर आले. पोलिसांना हा कळीचा मुद्दा मिळाला. चेतन चौधरी याने मुद्दाम त्याचा मोबाईल दुकानामध्येच ठेवला होता. तो दुकानातील कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन लोहगड येथे पोहचला होता. आपला ठावठिकाणा माहिती होऊ नये यासाठीच त्याने हा बनाव केला होता. डिजिटल पुराव्यामुळे या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. त्याआधारे सियाचा खतरनाक प्लॅन समोर आला. पण या सर्व प्रकरणात एका निष्पाप तरूणाचा बळी गेला. त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?