‘हा मूर्ख कोण आहे?’, खेसारी लाल यादववर का भडकली मलायका अरोरा, Video होतोय तुफान व्हायरल

मलायका अरोराने भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव याच्या एका व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आहे. तो व्हिडीओ पाहून मलायकाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हा मूर्ख कोण आहे?, खेसारी लाल यादववर का भडकली मलायका अरोरा, Video होतोय तुफान व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 24, 2026 | 2:37 PM

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव याच्या एका व्हायरल व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका भटक्या श्वानाशी करण्यात आलेल्या वागणुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, मलायकानेही यावर उघडपणे प्रतिक्रिया देत खेसारी लाल यादव याच्यावर टीका केली आहे.

अलीकडेच खेसारी लाल यादव ‘बॅटलग्राउंड’ या कार्यक्रमाच्या रेड कार्पेट इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससमोर पोझ देण्यासाठी तो उभा असताना तिथे एक भटका श्वान बसलेला होता. कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांनी त्या श्वानाला तेथून हटवण्यासाठी त्याला जबरदस्तीने ओढत नेल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

या घटनेदरम्यान खेसारी लाल यादवने कर्मचाऱ्यांना थांबवण्याचा किंवा श्वानाशी होत असलेल्या वागणुकीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे कॅमेऱ्यासमोर पोझ देत राहिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याच कारणामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्यावर टीका केली.

मलायका अरोराची संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मलायका अरोराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तो व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला. तिने लिहिले, ‘हे लोक कोण आहेत? आणि हा माणूस कोण आहे जो इतक्या शांतपणे उभा राहून पोझ देत आहे? अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.’

इतकेच नाही तर व्हायरल व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही तिने प्रतिक्रिया दिली. सुरुवातीला तिने निरर्थक अशी टिप्पणी केली. त्यानंतर आणखी एका कमेंटमध्ये तिने, हा मूर्ख कोण आहे? याच्यासाठी पोझ देणं इतकं महत्त्वाचं होतं का? असा संतप्त सवाल उपस्थित केला. मलायकाच्या या दोन्ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांमध्येही जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर मतमतांतरे

या व्हिडिओनंतर सोशल मीडिया दोन गटांत विभागल्याचे दिसून आले. अनेकांनी प्राण्यांशी अशा प्रकारची वागणूक चुकीची असल्याचे सांगत खेसारी लाल यादवने त्या वेळी हस्तक्षेप करायला हवा होता, असे मत व्यक्त केले. तर काही जणांनी कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळली असून, संपूर्ण घटनेसाठी खेसारी लाल यादवला जबाबदार धरणे योग्य नसल्याचे मत मांडले.

या व्हायरल व्हिडिओवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला असला, तरी या प्रकरणाबाबत खेसारी लाल यादवची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us