खाद्यावर हात ठेवला अन्… युवराज सिंगसोबत स्टेजवर अभिनेत्रीने जे केलं Video Viral
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये युवराज सिंग हा एका अभिनेत्रीसोबत स्टेजवर दिसत आहे. आता नेमकं काय झालं हे व्हिडीओमध्ये पाहा...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक वर्षांपूर्वी निरोप देऊनही युवराज सिंग आजही चर्चेत असतो. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) अभिषेक शर्मा आणि प्रियांश आर्या यांच्या धडाकेबाज खेळी पाहिल्यानंतर चाहते नेहमीच या ‘सिक्सर किंग’ची आठवण काढतात. मात्र, सध्या युवराजची चर्चा एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत स्टेज शेअर केल्यामुळे होत आहे. युवराज आणि अभिनेत्रीची केमिस्ट्री सर्वांना प्रचंड आवडली आहे. तसेच अभिनेत्रीने जे काही केलं ते पाहून सर्वचजण पाहात बसले.
अभिनेत्री नव्या नायर आणि माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग हे केरळमधील एका कार्यक्रमात आकर्षणाचे केंद्र ठरले. या सोहळ्यात नव्या नायरने केलेल्या एका छोट्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Yuvraj Singh with Kerala Actress Navya Nair 😍 pic.twitter.com/ruEuUcT6zT
— Deepu (@deepu_drops) May 9, 2026
नक्की काय घडलं?
केरळमध्ये आयोजित या रंगारंग कार्यक्रमात उत्सवाचे वातावरण होते आणि सर्वत्र कागदाचे रंगीत तुकडे (Confetti) उडत होते. याच दरम्यान, एक तुकडा युवराज सिंगच्या खांद्यावर येऊन पडला. युवराज मंचावर पाहुण्यांचे अभिवादन करण्यात मग्न असल्याने त्याचे याकडे लक्ष नव्हते. मात्र, शेजारीच उभ्या असलेल्या नव्या नायरने हे लगेच पाहिले. कोणताही विचार न करता किंवा कार्यक्रमात व्यत्यय न आणता, तिने अत्यंत सहजपणे पुढे होऊन युवराजच्या खांद्यावरील तो तुकडा हटवला. ही कृती अवघ्या सेकंदाची होती, पण कॅमेऱ्यात कैद झालेला हा क्षण चाहत्यांना भावला आहे.
चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. क्रिकेट आणि सिनेमाचा हा मेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. एका युजरने लिहिले, “युवराज आणि नव्या नायर एकत्र? क्रिकेटचा चार्म आणि सिनेमाची एलिगन्स, ही जोडी कमाल दिसतेय.” दुसऱ्या यूजरने गंमतीने लिहिले, “पाजी, आज घरी जाऊ नका, नाहीतर तिथे फील्डिंग सेट होईल (पत्नीची भीती).” अनेकांनी नव्या नायरच्या साधेपणाचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे.
कोण आहे नव्या नायर?
नव्या नायरचे खरे नाव धन्या वीणा आहे. ती एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे. मुख्यत्वे मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करणारी नव्या तमिळ आणि कन्नड चित्रपटांतही दिसली आहे. तिने २००१ मध्ये ‘इष्टम’ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. २००२ मधील ‘नंदनम’ या सुपरहिट चित्रपटातील ‘बालमणी’च्या भूमिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. लग्नानंतर काही काळ ब्रेक घेतल्यावर तिने ‘ओरुथी’ (२०२२) आणि ‘जानकी जाने’ (२०२३) या चित्रपटांतून शानदार पुनरागमन केले. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पाथिरात्री’ या मल्याळम थ्रिलर चित्रपटात ती अलीकडेच दिसली आहे.