Pooja Birari-Soham Bandekar Wedding : सासूबाईंपासून ते काका-काकूंपर्यंत.. पूजा बिरारी हिच्या उखाण्यात अख्ख्या बांदेकर कुटुंबाचं नाव, सोहमही भावूक

शाही विवाहसोहळ्यानंतर पूजा बिरारीने खास उखाणा घेत बांदेकर कुटुंबातील सर्वांचं नाव तर घेतलचं पण तिची आणि सोहमची लव्हस्टोरी कशी सुरू झाली तेही त्यात नमूद केलं होतं. तिचा उखाणा ऐकताच सर्वांची, चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत आसू अशी अवस्था होती

Pooja Birari-Soham Bandekar Wedding : सासूबाईंपासून ते काका-काकूंपर्यंत.. पूजा बिरारी हिच्या उखाण्यात अख्ख्या बांदेकर कुटुंबाचं नाव, सोहमही भावूक
लग्नानंतर पूजा बिरारीने घेतला खास उखाणा
Image Credit source: social media
Updated on: Dec 02, 2025 | 9:26 PM

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघा असून आजच्या (2 डिसेंबर) मुहूर्तावर अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकले. प्राजक्ता गायकवाडचं लग्न गाजलं, तिथे तेजस्विनी लोणारीचा विवाहाची तयारीही चर्चेत होती. तर सेलिब्रिटी कपल अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) आणि सोहम बांदेकर (Soham Bandekar) हेही आज शाही विवाहसोहळ्यात थाटात लग्नबंधनात अडकले. लोणावळ्यात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटीदेखील उपस्थित होते आणि त्यांनी पूजा-सोहमला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्न लागल्यानंतर सोहम आणि पूजा या दोघांनीही उखाणा घेत एकमेकांचं नाव घेतलं. मात्र पूजाने घेतलेल्या उखाण्यात फक्त तिच्या पतीचा म्हमजे सोहनचा उल्लेख नव्हता, तर तिने संपूर्ण बांदेकर कुटुंबालाही त्यात समाविष्च केलं होतं. तिचा लांबलचक पण तितकाच सुंदर उखाणा ऐकून सगळेच थक्क झाले, पण तितकेच भावूकही होते. सोहमसकट सर्वांच्याच डोळ्यात त्यावेळी पाणी आलं होतं.

पूजाने लग्नात घेतला खास उखाणा..

पूजा बिरारीने या खास उखाण्यातून तिची आणि सोहमची लव्हस्टोरी तर सांगितलीच, पण त्यासग बांदेकर कुटुंबाशी कसे ऋणानुबंध जुळले याची कथाही तिने गोड आवाजात ऐकवली. तिचा हा खास उखाणा ऐकून, वाचून तुमच्याही डोळ्यातक नक्कीच अश्रू येतील.

Pooja Birari-Soham Bandekar : रंगलो हळदीच्या रंगात.. सोहम-पूजाच्या हळदीचे Inside Photo समोर ! बांदेकरांची धमाल

बांदेकरांच्या सुनेने, पूजाने घेतलेला उखाणा जसाच्या तसा

घडलं सगळं अचानक थोडी भांबावलेकळलंच नाही कसं व्हावं व्यक्त… आपसूकच या नात्यात गुंतत गेले कारण, आहेत ते तितकंच मस्त!

एकेकाला भेटावं म्हणून माणसांची केली वाटणीसगळ्यात आधी लौकीकला भेटले कारण म्हणे तोच आहे याची आद्यपत्नी

घराखाली भेटायला येतेस का? म्हणून याने मला गंडवलंच अन् थेट आईसमोर नेऊन बसवलंचमाझ्या मनातील हुरहूर त्यांनाही (आईला ) जाणवलीत्याच म्हणाल्या काही काळजी करू नकोस

मलाही कळत नाहीये कसं व्हावं React… म्हटलं आताच एकमत झालंय तर आयुष्यभर अशाच राहू Intact!

पुढे भेटले आजीलादोघी आम्ही बिचाऱ्या एकमेकींकडे बघतच राहिलोभीती वाटली जाम, पटकन पाया पडले आणि सटकले तिकडून पुसत कपाळावरचा घाम

अरे! बघू तरी देकोण आहे मुलगी असं म्हणत बाबांशी झालं व्हिडीओ कॉलवर बोलणंत्यादिवसापासून मनात कोरलं गेलं त्यांचं ते गोड हसणं

हमममअगदी तुडुंब, मित्रांपासून भावंडांपर्यंत, आत्या-काकांपासूनमामा-मावशीपर्यंतयांच्या घरचे सगळेच आहेत भन्नाट…. आंबट, गोड, तिखट, चमचमीत जणू पाणीपुरी चाट !

हो’कार देत सोहमला आपलंसं केलं घर ताऱ्यांचंआज प्रसंगी नाव घेते साऱ्यांच

महेश काका, स्वाती काकू, प्रार्थना ताई, साई दादा, रोहित दादा, प्रणिता काकू, नागेश काका, संकल्प, शारण्य दादा, अस्मिता दीदी, मीरा काकू, अवधूत भाई, प्रभा काकू, अर्वी, भाग्यश्री, राजवीर, ज्योती मॅम, निकिता, क्रिशअरे बापरे हुश्श

यासोबतच संपूर्ण बांदेकर परिवाराला एकच घालते सादआयुष्यभर असं राहू द्या प्रेम आणि आशीर्वाद

बांदेकरांची सून म्हणून आलेतरीही मुलीचं नातं असेल कायमचं… माझ्या आईच्या विष्णुरुपी जावयाचं.. आज सगळ्यांच्या समक्ष नाव घेते सोहमचं.”

 

असा सुंदर उखाणा ऐकताना सर्वच जण अगदी गुंग झाले होते. पूजाच्या आवाजात, तिच्या खास स्वरांत हे शब्द ऐकताना शेजारी बसलेला सोहमही थोडा भावूक झालेला दिसला. त्या दोघांचाही हा गोड बाँड पाहून सर्वच भारावले. हा गोड उखाणा घेताना पूजालाही अश्रू अनावर झाले होते, पण सोहमने तिला सावरलं. त्यानंतर त्याने घेतलेल्या उखाण्याने एकच हशा पिकला आणि वातावरण थोडं हलकं झालं.