स्टंट करणं पडलं भारी, प्रियांका चोप्रा जखमी ; नेमकं काय झालं ?

प्रियांका चोप्रा केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही कार्यरत असून देश-विदेशात प्रसिद्ध आहे. अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असते. सध्या पीसी 'द ब्लफ'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

स्टंट करणं पडलं भारी, प्रियांका चोप्रा जखमी ; नेमकं काय झालं ?
| Updated on: Jun 19, 2024 | 11:49 AM

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरलेली प्रियांका चोप्रा हॉलिवूडमधील कामामुळे इंटरनॅशनल स्टार बनली आहे. सध्या ती अनेक प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असून एकाचवेळी अनेक चित्रपटांचं काम करत आहे. ‘द ब्लफ’ या आगामी चित्रपटामुळेही प्रियांका सध्या लाईमलाईटमध्ये आहे. शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो प्रियांका ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेकदा शेअर सकरत असते. मात्र तिने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे चाहचे काळजीत पडले आहेत. कारण ‘द ब्लफ’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली प्रियांका चोप्रा ही जखमी झाली आहे. फिल्म सेटवरच तिला दुखापत झाली.

प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीच्या मानेवर एक कट दिसत असल्याचे त्या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे. ‘द ब्लफ’च्या सेटवर तिला ही दुखापत झाल्याची माहिती प्रियांकाने पोस्टमधून सर्वांसोबत शेअर केली आहे. खरंतर, या चित्रपटासाठी प्रियांका ही एक स्टंट शूट करत होती आणि त्यादरम्यान तिच्या मानेला दुखापत झाली.

प्रियांकाची पोस्ट काय ?

इन्स्टा स्टोरीवर तिच्या दुखापतीचा फोटो प्रियांकाने शेअर करत कॅप्शनही लिहीली आहे. ‘माझ्या कामातील (व्यावसायिक) अडथळा’ असं तिने लिहीलं आहे. ‘द ब्लफ’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सर्वजण चित्रपटाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवत आहेत. प्रियांका चोप्राने जूनमध्ये ऑस्ट्रेलियात फ्रँक ई. फ्लॉवर्स या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. निर्मात्यांनाही ‘द ब्लफ’कडून खूप अपेक्षा आहेत.

बॉलिवूड रिलीज कधी ?

रुसो ब्रदर्सचे एजीबीओ स्टुडिओ आणि ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओ ‘द ब्लफ’ची निर्मिती करत आहेत. हॉलिवूडमध्ये बरीच बिझी असलेली प्रियांका चोप्रा बऱ्याच दिवसांपासून हिंदी चित्रपटांमध्ये दिसलेली नाही. त्यामुळे हॉलिवूड चित्रपटांसोबतच तिला बॉलिवूड चित्रपटांमध्येही पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. प्रियांका चोप्राच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या यादीत बॉलीवूड चित्रपटांच्या नावांचाही समावेश आहे.