“तू बॉलिवूडमध्ये काम केलं याची लाज वाटते…” प्रसिद्ध अभिनेत्रीने फवाद खानला चांगलच फटकारलं

 एका प्रसिद्ध अभिनेत्रीने पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला चांगलंच फटकारलं आहे. फवाद खान याने भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या हल्ल्याला लज्जास्पद म्हटले होतं. त्या पोस्टवर आता एका अभिनेत्रीने त्याच्या बॉलिवूडमध्ये काम करण्यावरून चांगलंच सुनावलं आहे. 

तू बॉलिवूडमध्ये काम केलं याची लाज वाटते... प्रसिद्ध अभिनेत्रीने फवाद खानला चांगलच फटकारलं
Actress Rupali Ganguly has harshly criticized Fawad Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 10, 2025 | 1:20 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे.भारतीय सैन्याने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडण्यात यश मिळवलं आहे. याबद्दल सर्वत्र भारताचं आणि भारतीय सेनेचं कौतुक होत असताना काही पाकिस्तानी कलाकार ज्यांनी बॉलिवूडमध्ये, भारतीय चित्रपटांमध्ये त्यांची एक ओळख निर्माण केली होती, त्यांनी भारताच्या या प्रत्युत्तराचा निषेध केला आहे.त्यानंतर त्यांच्यावर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

फवाद खाानला या अभिनेत्रीने चांगलंच सुनावलं 

त्यात सर्वात जास्त ट्रोल केलं ते पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला. फवाद खानने भारताविरोधी केलेल्या वक्तव्यामुळे त्याला सर्वत्र ट्रोल केलं जातं आहे. आता त्याच्या पोस्टवर एका अभिनेत्रीनेही राग व्यक्त केला आहे. या अभिनेत्रीने फवादला सोशल मीडियावर चांगलंच फटकारलं आहे. “तू भारतीय चित्रपटांमध्ये काम केलं याची लाज वाटते” अशा शब्दात तिने त्याला सुनावलं आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ हे ‘लज्जास्पद हल्ले म्हणणाऱ्या फवादवर संताप व्यक्त 

ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अनुपमा अभिनेत्री रुपाली गांगुली. तिने पाकिस्तानी अभिनेता फवाद खानवर सडकून टीका केली आहे. पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवरील हल्ले आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ हे ‘लज्जास्पद हल्ले’ म्हणणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्यावर तिने संताप व्यक्त केला आहे.

फवाद खानबद्दलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना रूपाली गांगुलीने x (ट्विटर) वर लिहिले आहे की, ‘भारतीय चित्रपटांमध्ये तू काम केलं आहे हे आमच्यासाठी लज्जास्पद आहे’ अभिनेत्रीच्या या प्रतिक्रियेला इतर नेटकऱ्यांनीही पाठिंबा दिला. तसेच फवादवर अनेक टीकाही केल्या आहेत.


फवादने पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

‘कपूर अँड सन्स’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेल्या फवाद खानने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्टवर हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांबद्दल चक्क शोक व्यक्त केला. त्याच्या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, “या लज्जास्पद हल्ल्यात जखमी झालेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल माझी मनापासून सहानुभूती आहे. मी मृतांसाठी आणि त्यांच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करतो.” तो पुढे म्हणाला, “सर्वांना नम्र विनंती आहे की, भडकाऊ शब्दांनी आगीत तेल ओतणे थांबवा. निष्पाप लोकांच्या जीवाचे ते मूल्य नाही. चांगल्या अर्थाने काम करावं.” फवादचे इंस्टाग्राम हँडल भारतात ब्लॉक करण्यात आलं असली तरी त्याच्या पोस्टचे स्क्रीनशॉट मात्र व्हायरल होत आहेत.

फवाद खानसोबत अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारताच्या विरोधात भूमिका घेतली 

केवळ फवाद खानच नाही तर इतर पाकिस्तानी कलाकारांनीही भारताविरुद्ध विष ओकलं आहे. यात माहिरा खान, हानिया आमिर आणि सजल अली सारख्या इतर पाकिस्तानी अभिनेत्री आहेत. त्यांनी भारतातील दहशतवाद्यांवर झालेल्या हल्ल्याला भ्याडपणाचे वर्णन केलं आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 7 मे रोजी बुधवारच्या पहाटे भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी लाँच पॅडना लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे पाकिस्तानला भारताच्या ताकदीची नक्कीच कल्पना आली आहे.