ऐश्वर्या राय आणि सलमान खानबद्दल ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, तो अनुभव माझ्यासाठी वाईट, कारण…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी चित्रपटात हीट ठरलीये. आता नुकताच एका अभिनेत्रीने या दोघांसोबतचा काम करण्याचा वाईट अनुभव सांगितला आहे.

ऐश्वर्या राय आणि सलमान खानबद्दल या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, तो अनुभव माझ्यासाठी वाईट, कारण...
Salman Khan and Aishwarya Rai
| Updated on: Aug 08, 2025 | 9:04 AM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांनी बॉलिवूडला हीट चित्रपट दिली आहेत. काही दिवस दोघांनी एकमेकांना डेट केल. मात्र, एका वाईट वळणावर दोघांचे ब्रेकअप झाले. सलमान खानने अनेकदा ऐश्वर्या रायच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असलेल्या सेटवर जाऊन गोंधळ घातला. आता नुकताच एका अभिनेत्रीने सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्याबद्दल मोठा खुलासा केलाय. आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे तिने सांगितले आहे.

संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये सलमान खान, ऐश्वर्या राय आणि शीबा चड्ढा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातून शीबा चड्ढाला मोठा ब्रेक मिळणार होता. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपल्यासोबत असे काही घडले की, ज्यानंतर शीबाला मोठा धक्का बसला होता. आता त्यावर पहिल्यांदाच शीबा चड्ढाने भाष्य केले आहे.

शीबा चड्ढाने मुलाखतीत म्हटले की, एक सीन होता, त्यामध्ये मी ऐश्वर्या राय आणि सलमान खान होतो. यामध्ये सलमान खान याला मला गळ्याला लावायचे होते. मात्र, सलमान खानने माझी गळाभेट घेण्यास थेट नकार दिला आणि मी हा सीन करणार नसल्याचे स्पष्ट म्हटले. मुळात म्हणजे हा सीन असा होता की, मी पळणार होते आणि अगोदर ऐश्वर्या राय माझी गळाभेट घेणार होती आणि त्यानंतर सलमान खान.

पण हा सीन करण्यास सलमान खानने नकार दिला आणि काही वेळ शूटिंग थांबली. यानंतर भंन्साळी यांनाच सलमान खानला बोलावे लागले. काही वेळ सर्वांनाच वाट बघावी लागली. पर्सनली सलमानचे आणि माझे काही देणे घेणे नव्हते. पण त्याने माझ्यासोबत हा सीन करण्यास नकार दिला आणि त्यावेळी तिथे ऐश्वर्या राय देखील उपस्थित होती. यासोबत शीबाने सलमानबद्दल धक्कादायक खुलासा केला. एक सीन होता, ज्यामध्ये सलमानला पडायचे होते. मात्र, त्यादरम्यान सलमानला इतका जास्त राग आला की, तो सेटवरून रागाच्य भरात निघाला आणि त्याने दरवाजा इतका जास्त जोरात आदळला की, सेटवरील एका वयस्कर व्यक्तीला लागला आणि त्याला दुखापत झाली.