शेफाली जरीवालावर कोणत्या धार्मिक पद्धतीने झाले अंत्यसंस्कार; जरीवालाचा अर्थ काय आहे?

शेफालीच्या निधनानंतर तिच्यावर कोणत्या धार्मिक पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. कारण तिच्या 'जरीवाला' या आडनावाचा अर्थ काय? याबद्दल सर्वांनाच प्रश्न आहे.

शेफाली जरीवालावर कोणत्या धार्मिक पद्धतीने झाले अंत्यसंस्कार; जरीवालाचा अर्थ काय आहे?
Shefali Jariwala
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 29, 2025 | 11:45 AM

“काँटा लगा” या गाण्याच्या व्हिडिओमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. शेफाली जरीवाला ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी “कांता लगा” या गाण्याच्या व्हिडिओमुळे प्रसिद्ध झाली आणि लोकांच्या मनावर राज्य केली. पण आता ती लोकांमध्ये नाही. शेफाली जरीवाला यांचे वयाच्या 42 व्या वर्षी अचानक कार्डियाक अरेस्टने तिचे निधन झाले.

शेफालीवर कोणत्या विधींनी अंत्यसंस्कार 

शेफालीने इंडस्ट्रीमध्ये बरंच नाव कमावलं आहे. पण तिच्याबद्दलची एक गोष्ट जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. ती म्हणजे तिच्या आवडनावावरून तिच्यावर अंत्यसंस्कार कोणत्या विधींनी करण्यात आले? आणि तिच्या आडनावाचा अर्थ काय?

शेफाली तिच्या नावापुढे जरीवाला हे आडनाव लावायची

शेफाली तिच्या नावापुढे जरीवाला हे आडनाव लावायची. याचा अर्थ काय? शेफाली जरीवाला यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथील एका गुजराती कुटुंबात झाला. शेफाली जरीवाला एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबातून आली. तिचे वडील सतीश जरीवाला हे एक व्यापारी आहेत आणि तिची आई सुनीता जरीवाला स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये काम करत होती. शेफाली जरीवाला हिंदू धर्माच्या होती आणि त्यांचे अंत्यसंस्कारही ओशिवरा येथील हिंदू स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने करण्यात आले.


ज्याचा अर्थ ‘विणकाम’ असा होतो 

शेफालीने तिच्या नावात वापरलेला जरीवाला हा शब्द ‘जरीवाला’ आहे, जो एक भारतीय (बहुतेक गुजराती) आडनाव आहे. याचा अर्थ विणकराचे व्यावसायिक नाव आहे. हा गुजराती शब्द ‘जरी’ पासून आला आहे. ज्याचा अर्थ ‘विणकाम’ असा होतो. जरीवाला हे आडनाव पारंपारिकपणे विणकामाशी संबंधित असलेल्या लोकांच्या वंशजांना सूचित करते. शेफालीचे वडील देखील विणकामाचा व्यवसाय करायचे.

जरीवाला या आडनावाचा अर्थ विणकर किंवा जरीकाम करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित

जरीवाला या आडनावाचा अर्थ विणकर किंवा जरीकाम करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित आहे. हा आडनाव गुजराती शब्द ‘झारी’ पासून आला आहे, ज्याचा अर्थ सोन्याच्या किंवा चांदीच्या धाग्यांनी केलेले विणकाम किंवा भरतकाम (ज्याला ब्रोकेड वर्क देखील म्हणतात) आणि ‘वाला’ प्रत्यय, ज्याचा अर्थ ‘कर्ता’, ‘व्यावसायिक’ किंवा ‘संबंधित’ असा होतो.’जरीवाला’ हे आडनाव अशा कुटुंबांना किंवा वंशजांना सूचित करते जे पारंपारिकपणे जरीकाम, विणकाम किंवा कापड उद्योगाशी संबंधित आहेत.