
मासिक पाळीच्या काळात अनेक महिला तीव्र वेदनांमुळे त्रासलेल्या असतात. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना सेलिब्रिटी महिलांना देखील सहन करावा लागतो. अभिनेत्री श्रृती हसन हिने एका मुलाखतीत मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांवर मोठं वक्तव्य केलं. अनेक भाषांमध्ये स्क्रिनवर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या श्रृती हसन हिने मासिक पाळी बद्दल स्पष्ट मत मांडलं होतं.
शाळेत असताना आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अभिनेत्री म्हणाली, ‘शाळेत असताना मासीक पाळी दरम्यान जेव्हा वेदना व्हायच्या तेव्हा घरी पाठवलं जायचं. असं जेव्हा व्हायचं तेव्हा हार्मोनल मेडिसिन घ्याव्या लागयच्या. त्यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या देखील असायच्या…’
‘औषधं डॉक्टर द्यायचे. ज्यामुळे वेदना कमी व्हायच्या, पण याचे साईड इफेक्ट देखील आहेत. वजन वाढणं, मूड स्विंग्स होणं… य औषधांचा एकच फायदा आहे आणि तो म्हणजे स्किन चांगली राहते. प्रत्येक महिन्यात मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांची मला भीती वाटू लागली होती.’
‘मासिक पाळी सुरु असताना डान्स करताना आणि स्टेजवर जाण्याची देखील भीती मला वाटायची. मूड स्विंगसोबतच प्रचंड वेदना देखील व्हायच्या…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पुढे श्रृती म्हणाली, ‘मासिक पाळी सर्व महिलांना होते. तू त्याचा एवढा मोठा मुद्दा का करतेय? जेव्हा माझ्या वेदना वाढू लागल्या तेव्हा मी तपासणी केली आणि मला PCOS असल्याचं निदान झालं. मासिक पाळी दरम्यान माझं वर्कआउट देखील वेगळं असतं. मी दारू पिणं देखील बंद केलं आहे. गेल्या 7 वर्षांपासून मी औषधं घेत आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
श्रृतीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री डान्स, अभिनय आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील श्रृतीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अभिनेत्री स्वतः सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.